उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- अवैध सागवान तस्करीवर व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी ६ एप्रिल २०२३ रोजी सिरोंचा वनविभागा अंतर्गत विभागीय कार्यालय येथील प्राणहिता सभागृहमध्येआंतरराज्यीय (महाराष्ट्र- तेलंगाना) समन्वय सभेचे आयोजन करण्यात आलेले होते.तस्कर महाराष्ट्रातील सागवान माल अवैध वृक्षतोड करुन गोदावरी नदीपात्रातुन तेलंगाना राज्यात पाठवित असतात आणि तोच सागवान माल उचलून तेलंगानीत तस्कर रस्ता मार्गे त्याची इतरत्र ठिकाणी विक्री करित असतात.त्यामुळे सागवान तस्करीवर आळा घालणे गरजेचे असल्यामुळे सिरोंचा वनविभागाचे पुढाकारातुन,आंतरराज्यीय (महाराष्ट्र-तेलंगाना) समन्वय सभेचे आयोजन करण्यात आले.
समन्वय सभेमध्ये अवैध सागवान तस्करीवर चर्चा आणि तस्करीवर आळा घालण्यासाठी दोन्ही राज्यांनी मिळून उपाययोजना कशा पद्धतीने करता येईल यावर सविस्तर मार्गदर्शन अधिकारी यांनी केले.तसेच गुप्त बातमीचे जाळे पसरवून दोन्ही राज्यातील वनकर्मचारी यांचे व्हॉट्सप ग्रुप तयार करुन ज्या मार्गाने मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होते; त्या मार्गावर सागवान तस्करी रोखण्यासाठी वनकर्मचारी यांचे संयुक्त गस्त मोहीम राबविण्याबाबत सभेमध्ये चर्चा करण्यात आली.तसेच अवैध सागवान तस्करी रोखण्यासाठी स्थानिक लोकांकडून वनकर्मचारी यांना कोणत्या प्रकारच्या समस्या येतात आणि त्या समस्या सोडविण्याकरिता कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करावयाचे आहेत,याबाबत सुध्दा चर्चा करण्यात आली.

तसेच सभेमध्ये श्रीमती बी.लावण्या IFS District Forest officer,जयशंकर भुपालपल्ली (T.S) यांनी महाराष्ट्रातुन तस्करी होवून कुठे-कुठे सागवान माल लपवून ठेवला जावू शकतो; अशा सर्व ठिकाणाची माहिती त्यांनी दिली.तसेच अवैध वाहतुक होणार नाही, याकरिता तेलंगानाच्या बाजुला जे चोरवाटांचे रस्ते आहेत; अशा रस्त्यांवर वनउपज तपासणी नाक्याची निर्मीती करण्यात येईल याबाबत सांगीतले.
आंतरराज्यीय समन्वय सभेमध्ये तेलंगानातील श्रीमती बी.लावण्या IFS District Forest officer, जयशंकर भुपालपल्ली (T.S) तसेच सी.वज्रारेड्डी, FDO,श्रीमती एम.कमला RFO,व्येकंटेश्वर राव RFO आणि वनपाल व वनरक्षक उपस्थित होते.तसेच सिरोंचा वनविभागातील श्रीमती पूनम पाटे IFS उपवनसंरक्षक सिरोंचा वनविभाग सिरोंचा, पी.एम.पाझारे वपअ सिरोंचा,आर.एम.तोकला वपअ
आसरअल्ली चिलकर, वपअ विशेष सेवा आसरअल्ली आणि वनपाल व वनरक्षक असे दोन्ही राज्यातील मिळून एकूण ५० अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.असे उपवनसंरक्षक सिरोंचा वनविभाग, सिरोंचा पूनम पाटे यांनी कळविले आहे.