Thursday, October 1, 2026
Homeगडचिरोलीसाहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या कथा, कवितेला पुरस्कार....-गोवा राज्याच्या 'आरती' मासिकामध्ये प्रकाशन…

साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या कथा, कवितेला पुरस्कार….-गोवा राज्याच्या ‘आरती’ मासिकामध्ये प्रकाशन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गोवा राज्याच्या प्रसिद्ध आरती मासिकातर्फे दरवर्षी कथा व कविता स्पर्धा आयोजित करण्यात येतात.यंदा आयोजित करण्यात आलेल्या  “पुण्यातील ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर पुरस्कृत उत्कृष्ट कथास्पर्धा व उत्कृष्ट कवितास्पर्धा -२०२३” मध्ये झाडीपट्टीतील साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या “श्रृंखला” या कथेस द्वितीय क्रमांकाचे व “रानगर्भ फुलत आहे” या कवितेस प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आल्याचे “आरती” मासिकाचे संपादक प्रणव भागवत व भारत गावडे यांनी कळविले आहे.एखाद्या दिवाळी अंकात एकाच वेळी एकाच साहित्यिकाच्या दोन साहित्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे.या दोन्ही पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम असे आहे.वरील दोन्ही साहित्यांना यंदाच्या आरती दिवाळी अंकात प्रकाशित करण्यात आले आहे. 

चुडाराम बल्हारपुरे हे झाडीपट्टीतील राज्य पुरस्कार प्राप्त नाटककार आहेत.त्यांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कार प्राप्त झालेले आहे.आजपर्यंत त्यांची विविध १३ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध स्तरावरील अनेक पुरस्काराने ते सन्मानीत आहेत.महामृत्युंजय मार्कंडेश्वर,बहूढंगी समाधीवाले बाबा,स्पेशल रिपोर्ट,धरती आबा-क्रांतीसुर्य बिरसा मुंडा व गोंडवानाचा महायोध्दा-क्रांतिवीर बाबूराव शेडमाके ही त्यांची गाजलेली नाटके आहेत.

चुडाराम बल्हारपुरे यांच्या यशाबद्दल प्रा.अरुण बुरे, योगेश गोहणे,प्राचार्य डॉ.श्याम मोहरकर,प्रा.डॉ. जनबंधू मेश्राम,प्रा.एस.एस.जगताप,प्रा.डॉ.माधव कांडणगीरे, प्रा.डॉ.राजकुमार मुसणे,प्रा.नवनीत देशमुख (साहित्यिक), लक्ष्मीकमल गेडाम (साहित्यिका),मधुश्री प्रकाशनचे प्रा. Lपराग लोणकर (प्रकाशक),डॉ.एस.एन.पठाण, डॉ.परशुराम खुणे, प्रमोद बोरसरे,कुसूमताई आलाम(साहित्यिका), हिरामण लांजे (साहित्यिक),प्रा. प्रब्रम्हानंद मडावी,प्रा. डॉ बावनकुळे,नरेश बावणे उपसंपादक देशोन्नती, पुंडलिक भांडेकर (पत्रकार) व इतर साहित्यिक मित्रांनी अभिनंदन केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुचाकीचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-दोन दुचाकींच्या भीषण अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला,तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना काल बुधवारच्या मध्यरात्री गोंदिया-गोरेगाव मार्गावर घडली.पीयूष...

अखेर उद्या होणारा व्यापारी संघटनांचा ‘नो यूपीआय डे’ मागे..!

उद्रेक न्युज वृत्त :-यूपीआय व्यवहारांवर मर्चेंट डिस्काउंट रेट(MDR)लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने या प्रस्तावित निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.या निर्णयाचा तीव्र निषेध...

उपविभागीय अभियंता बाळू षटगोपनवार यांचा निरोप समारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंदेवाहीचे उपविभागीय अभियंता बाळू जगन्नाथ षटगोपनवार यांच्या सेवापूर्ती निमित्त निरोप समारंभ आज गुरुवारी उत्साहात पार पडला.यावेळी षटगोपनवार यांचा...

गडचिरोलीत गर्भाशयमुखाचा कर्करोग रोखण्यासाठी एचपीव्ही लसीकरण; १ हजार २५४ किशोरवयीन मुलींना दिली लस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी गडचिरोली जिल्ह्यात शंभर टक्के एचपीव्ही लसीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी आदिवासी व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!