उद्रेक न्युज वृत्त :-मार्च महिना आला की आयकर रिटर्न,पॅनकार्ड म्हणजेच आर्थिक गोष्टींशी संबंधित विषयांची चर्चा सुरु होते.लोकांची होणारी ही धांदल लक्षात घेत अनेक सायबर गुन्हेगार फसवणूक करण्यासाठी दबा धरुन बसलेले असतात.यादरम्यान, मोबाइलवर कॉल आणि मेसेज करत लोकांची फसवणूक केली जाते.सध्या अशाच प्रकारे सायबर चोरांकडून गंडा घातला जात असून वेळेवर सतर्कता बाळगली नाही तर आपण त्याला बळी पडू शकतो. सध्या स्थितीत लोकांची फसवणूक करण्यासाठी सायबर गुन्हेगार पॅनकार्डची मदत घेत आहेत.तुमचे पॅनकार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याचे सांगत ही फसवणूक केली जात आहे.’जर तुम्ही पॅन कार्ड आणि बँक खाते लिंक केले नाही तर तुमचे खाते बंद होईल’, असे या मेसेजमध्ये सांगितले जाते.यानंतर ॲपच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. अनेक ठिकाणी आठवडाभरात पॅनकार्ड फसवणुकीचे अधिक गुन्हे दाखल झाले आहेत.त्यामुळे पोलिसांनी लोकांना सायबर चोरांपासून सावधान राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सावधान….!पॅनकार्ड संबंधित तुम्हालाही येऊ शकतो फेक मॅसेज
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES