Thursday, June 25, 2026
Homeगडचिरोलीसावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केला आहे.नागरिकांनी अशा अप्रमाणित जाहिरातींवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रकारची आर्थिक व्यवहार अथवा वैयक्तिक माहिती संबंधित व्यक्तींना देऊ नये,असे आवाहन केले आहे.
मागील काही दिवसांपासून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जिल्हा परिषद,गडचिरोली अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित केली जात आहे.या जाहिरातीत गडचिरोली, अहेरी,आरमोरी,भामरागड,चामोर्शी,एटापल्ली,कोरची, कुरखेडा,मुलचेरा,सिरोंचा,देसाईगंज,धानोरा यांसह विविध तालुक्यांतील शाळांमध्ये प्रतिमहा २२ हजार रुपये वेतनावर भरती केली जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सदर जाहिरात जिल्हा परिषद,गडचिरोली यांनी प्रसिद्ध केलेली नसून तिचा जिल्हा परिषदेशी कोणताही संबंध नाही.संबंधित जाहिरात तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली असून ती नागरिकांची दिशाभूल करणारी आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,गडचिरोली यांनी सांगितले की,जिल्हा परिषदेमार्फत कोणतीही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्यास त्यासंदर्भातील अधिकृत जाहिरात केवळ जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि मान्यताप्राप्त दैनिक वृत्तपत्रांमधूनच प्रसिद्ध केली जाते.त्यामुळे नागरिकांनी केवळ अधिकृत माध्यमांवरील माहितीवरच विश्वास ठेवावा.
जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व नागरिक,बेरोजगार युवक-युवती तसेच पालकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित भरती जाहिरातींची सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये.कोणत्याही संशयास्पद जाहिरातीबाबत संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून खात्री करावी,असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!