Thursday, October 1, 2026
Homeगोंदियासावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. - गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण
चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा मार्ग म्हणून ऑनलाईन गेमचा पर्याय निवडतात.ऑनलाईन गेम हा मनोरंजन वा खाली वेळातील विरंगुळा म्हणून ठीक आहे; पण काही तरुण झटपट पैसा कमविण्याच्या नादात ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येते.अश्याच प्रकारे गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा शहरातील २६ वर्षीय तरुण ऑनलाईन गेमिंगच्या विळख्यात इतका अडकला की,शेवटी त्याच्यावर जीव देण्याची पाळी आली.त्यामुळे, ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून पैसे कमविण्याच्या चार हात दूरच राहणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरला जीवघेणा👇
गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा शहरातील ठाकूर मोहल्ल्यातील २६ वर्षीय मयूर दिवाकर उके हा तरुण परिसरात मिळेल ते काम करून रोजची रोजी-रोटी कमावून आई-वडिलांना हातभार लावायचा.अश्यातच त्याला काही कालावधीपूर्वी ऑनलाईन गेम खेळण्याची सवय जडली.ऑनलाईन गेम खेळता- खेळता गेमिंगच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे, याची माहिती होताच त्याने त्यात पैसे टाकायला सुरुवात केली.सुरुवातीला मयूरने काही पैसे जिंकले. पण,नंतर गेमिंगमध्ये पैसे गमावत असल्याने तो आर्थिक अडचणीत आला.त्यामुळे तो नेहमी वडिलांकडे पैशांची मागणी करू लागला. दरम्यान,मयूरच्या आईची तब्बेत बरी नसल्याने ती उपचारासाठी गडचिरोली येथे गेली.तिच्यासोबत मयूरचे वडीलही गेले.पैश्याची जुळवाजुळव होत नसल्याने मयूर आर्थिक विवंचनेत सापडला.काय करावे त्यास सुचेनासे झाल्याने अखेर त्याने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच १५ ऑगस्टला घरी कुणीही नसतांना मयूरने घरातील स्वयंपाकघराच्या मध्यभागी असलेल्या सीलिंग फॅनच्या कडीला काळ्या रंगाच्या रेशमी धाग्याची रस्सी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.प्रकरणी तिरोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार नामूर्ते करीत आहेत.ऑनलाईन गेमिंगचा नाद किती घातक ठरू शकतो,हे सदरच्या घटनेवरून दिसून येत आहे.त्यामुळे,ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून पैसे कमावण्याच्या नादात पडू नका.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर उद्या होणारा व्यापारी संघटनांचा ‘नो यूपीआय डे’ मागे..!

उद्रेक न्युज वृत्त :-यूपीआय व्यवहारांवर मर्चेंट डिस्काउंट रेट(MDR)लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने या प्रस्तावित निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.या निर्णयाचा तीव्र निषेध...

उपविभागीय अभियंता बाळू षटगोपनवार यांचा निरोप समारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंदेवाहीचे उपविभागीय अभियंता बाळू जगन्नाथ षटगोपनवार यांच्या सेवापूर्ती निमित्त निरोप समारंभ आज गुरुवारी उत्साहात पार पडला.यावेळी षटगोपनवार यांचा...

गडचिरोलीत गर्भाशयमुखाचा कर्करोग रोखण्यासाठी एचपीव्ही लसीकरण; १ हजार २५४ किशोरवयीन मुलींना दिली लस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी गडचिरोली जिल्ह्यात शंभर टक्के एचपीव्ही लसीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी आदिवासी व...

आजपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या ‘या’ प्रवाशांना एक ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा कडक निर्णय घेत 'आरक्षित' केलेल्या तिकिटांवर किंवा 'ई-पास'वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज,गुरुवार १ ऑक्टोंबरपासून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!