- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्याच्या घडीला अँड्रॉइड मोबाईल वापरकर्त्यांसह खासगी क्षेत्र,शासकीय कार्यालये तसेच इतर विविध ठिकाणी जीमेल खात्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आहे.त्यामुळे अलिकडच्या सेल्सफोर्स डेटाबेस हॅकिंग आणि अनेक फिशिंग हल्ल्यांनंतर सॉफ्टवेअर कंपनी गुगलने जगभरातील अडीच अब्ज जीमेल खात्यांचा वापरकर्त्यांसाठी सुरक्षा सतर्कतेचा इशारा दिला आहे.लाखो खाती धोक्यात असून, जीमेलचा पासवर्ड ताबडतोब बदलण्याचा आणि द्विघटक प्रमाणिकरण म्हणजेच ‘टू स्टेप व्हेरिफिकेशन’ सक्षम पासवर्ड करण्याचा सल्ला गुगलने दिला आहे.हॅकर्स जीमेल वापरकर्त्यांना लक्ष्य करण्यासाठी दोन प्रमुख पद्धती वापरत असल्याचे गूगलच्या सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे.हॅकर्सनी त्यांना वापरकर्त्यांसारखे हुबेहुब बनावट ईमेल पाठवले.त्यातील लिंक्स वापरकर्त्यांना बनावट लॉगिन पेजवर नेत होत्या.अनेक वापरकर्त्यांनी चुकून जीमेल क्रेडेन्शियल्स आणि टू एफए कोड प्रविष्ट केले.त्यामुळे हॅकर्सना खात्यावर पूर्ण नियंत्रण मिळाले. यामुळे सेल्सफोर्स डेटाबेसचे उल्लंघन झाले असून,या हल्ल्यामागे शायनीहंटर्स नावाचा गट असल्याची पुष्टी गुगलने केली आहे.याच गटाने यापूर्वी एटी अँड टी आणि मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या ग्रूपना हॅक केले आहे. चोरीचा डेटा हा गट लीक करू शकतो.त्यामुळे जीमेल वापरकर्त्यांनी एक स्ट्राँग पासवर्ड अपडेट करा.इतर अन्य प्लॅटफॉर्मवर वापरला जात नाही,असा पासवर्ड तयार करा.अज्ञात ईमेल किवा संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नका,टू स्टेप व्हेरिफिकेशन प्रमाणीकरण सक्षम करा,जेणेकरून पासवर्ड लीक झाल्यानंतरही खाते सुरक्षित राहील.
- Advertisement -

