Saturday, July 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान…!अन्यथा बँक खाते होणार रिकामे..-तुम्हालाही येऊ शकतो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाखाली...

सावधान…!अन्यथा बँक खाते होणार रिकामे..-तुम्हालाही येऊ शकतो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या नावाखाली फसवा मॅसेज…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली ऑनलाईनचा ट्रेण्ड मोठ्या झपाट्याने सर्वत्र वाढीस लागला आहे.त्यामुळे सायबर चोरटे सक्रिय झाले आहेत.सायबर चोरटे नवनवीन शक्कल लढवून अनेक बँक खातेधारकांची फसवणूक करतांना दिसून येत आहेत.कुठली ना कुठली लिंक पाठवून आपला डाटा चोरी करून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत असतात.त्यामुळे आजकाल फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.सध्या स्थितीत एसबीआयमधील(स्टेट बँक ऑफ इंडिया)लोकांची खाती हॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.एसबीआयच्या ग्राहकांना मेसेज पाठवून त्यांच्या खात्यातून पैसे काढले जात आहेत.याबाबत सरकारने इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून रिवॉर्ड पॉइंट्सच्या नावाखाली एसबीआय खातेधारकांची फसवणूक होत आहे.लोकांना ईमेल आणि मेसेजद्वारे रिवॉर्ड पॉइंटचे आमिष दाखवून तसेच सोशल मीडियावर फिरणाऱ्या फसव्या मेसेजद्वारे सायबर फसवणूक करून पैसे उकळण्याचा कट सुरू आहे.

एसबीआयने म्हटले आहे की,असे मेसेज चुकीचे आहेत आणि एसबीआय कधीही आपल्या ग्राहकांना एसएमएस किंवा व्हॉट्सॲपद्वारे कोणतीही लिंक पाठवत नाही.लोकांना बँक आणि सरकारकडून एपीके फाइल डाउनलोड न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.लोकांना अत्यंत सतर्क आणि सावध राहण्यास सांगण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात तिरंदाजी खेळाचे प्रशिक्षण केंद्र; आष्टी येथे खेळाडू निवड चाचणीचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयामार्फत खेलो इंडिया आर्चरी प्रशिक्षण केंद्र(आष्टी)अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात आर्चरी(तिरंदाजी)खेळाचे प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले आहे.या केंद्रात ३० प्रशिक्षणार्थी...

लाडक्या बहिणींची अंतिम लाभार्थी यादी जाहीर; ८० लाखाहून अधिकच्या महिलांचे दीड हजार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :- 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेची अंतिम लाभार्थी यादी निश्चित करण्यात आली असून राज्यातील १ कोटी ६६ लाख २८ हजार ४८ महिला योजनेसाठी...

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा होणार गौरव; राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती,दिव्यांग व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यासाठी भारत सरकारच्या दिव्यांगजन सशक्तीकरण विभागामार्फत दरवर्षी ३ डिसेंबर रोजी...

तब्बल सहा महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेली बारावीची विद्यार्थिनी सापडली पतीसोबत..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बारावीत शिक्षण घेणारी विद्यार्थिनी सहा महिन्यांपूर्वी घरी कुणालाही काहीही न सांगता निघून गेल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला.मात्र,मुलीची काहीच माहिती मिळत नसल्याने अखेर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!