Friday, July 31, 2026
Homeबीडसामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
बीड :-तक्रारदारास तंबी देऊन तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यास(DFO)छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज,शुक्रवार ३१ जुलै रोजी रंगेहाथ पकडले.श्रीनिवास लिंगन्ना लखमावाड असे लाचखोर विभागीय वन अधिकाऱ्याचे नाव आहे.विशेष म्हणजे,प्रकरणातील तक्रारदार हे स्वतः सामाजिक वनीकरण विभागातील असल्याने जिल्ह्याच्या वन विभागात एकच खळबळ माजली आहे.
राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार या दोन दिवसीय जिल्हा दौऱ्यावर असून, आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली.बैठकीत जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. तसेच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.सदर बैठकीला विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावाड हेही उपस्थित होते.
बैठक संपल्यानंतर श्रीनिवास लखमावाड आपल्या राहत्या घरी गेले.त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पूर्वनियोजित सापळा रचत त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला.यावेळी ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.कारवाईनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून,पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.तक्रारदार हे स्वतः सामाजिक वनीकरण विभागातील असून त्यांच्या विविध प्रलंबित कामांसाठी लखमावाड याने तब्बल ४५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.वृक्ष लागवडीचा निधी वितरीत करण्यासाठी १२ टक्के प्रमाणे मोबदला,निलंबनाचा प्रस्ताव पाठपुरावा न करणे,प्रलंबित दोन वेतनवाढ देणे,नर्सरी कामाची चौकशी न करता सहकार्य करणे यासाठी लाच मागितली होती.याबाबत तक्रारदाराने दोन दिवसांपूर्वी म्हणजेच २९ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.तक्रार दिल्यानंतर एसीबीने लाचेच्या मागणीची पडताळणी करून खात्री केली होती. त्यानुसार,आज शुक्रवारी श्रीनिवास लखमवाड यांनी ४५ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.या रकमेत ५ लाख रुपये खऱ्या नोटा तर उर्वरित रक्कम मनोरंजन बँकेच्या(डमी)नोटांच्या स्वरूपात होती.सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक बाळासाहेब शिंदे,पोलिस निरीक्षक भास्कर नवले,अंमलदार भीमराज जिबडे,पुष्पा दराडे,अनवेज शेख,प्रकाश डोंगरदिवे,रामेश्वर ताठे यांच्या पथकाने केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

क्रिकेटपटू तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-क्रिकेटच्या मैदानावर मोठे नाव कमावण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका १७ वर्षीय क्रिकेटपटू तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नागपूरच्या बजाजनगर पोलिस...

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

बांधकाम कामगारांनो सावधान..! योजनांच्या नावाखाली कुणालाही पैसे देऊ नका- न्यू ह्यूमन राईट अँड फाईट रिसर्च फाउंडेशनचे आवाहन

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांच्या नावाखाली काही ठिकाणी एजंट,दलाल,मध्यस्थ किंवा इतर व्यक्तींमार्फत बांधकाम...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!