Wednesday, September 16, 2026
Homeकुरखेडासात गावांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी नियमित बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी..

सात गावांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी नियमित बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील  आंधळी,नवरगाव,वाघेडा,बेलगाव,खैरी,मालदुगी आणि घाटी या सात गावांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी सकाळी व सायंकाळी नियमित बससेवा उपलब्ध करून द्यावी,अशी ठाम मागणी ग्राम बाल संरक्षण समिती,आंधळी व बाल पंचायतच्या वतीने करण्यात आली आहे.
‘कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्याय काळजी’ या प्रकल्पांतर्गत गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समिती व बाल पंचायत गठीत करण्यात आली असून,प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण,सामाजिक जबाबदारी आणि निर्णयक्षमता विकसित करण्याचे काम सुरू आहे.
सातही गावांतील विद्यार्थ्यांना दररोज शाळेत ये-जा करण्यासाठी नियमित वाहतुकीची आवश्यकता आहे. सकाळी शाळेत वेळेत पोहोचणे तसेच सायंकाळी शाळा सुटल्यानंतर सुरक्षितपणे घरी परतण्यासाठी बससेवा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे निवेदनातून नमूद करण्यात आले.यासंदर्भात विद्यार्थ्यांच्या सह्यांसह वाहतूक नियंत्रक कुरखेडा  गौतम गेडाम तसेच पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी रामदास गुंजाळ यांना निवेदन देण्यात आले.यावेळी ग्रामपंचायतीचा ठरावही संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला.
निवेदन देतांना गावातील माजी उपसरपंच तथा ग्राम बाल संरक्षण समिती सदस्य अप्रव भैसारे,नानाजी खुणे, पोलीस पाटील प्रकाश जनबंधू,आरोग्य स्वयंसेविका माया कोचे,सुप्रिया बन्सोड,रोशनी लाडे, लीलाधर उईके,संदीप कराडे,हेमंत भानारकर,रुद्र कराडे,चेतन लाडे,साहिल निर्वान,गौरव उईके,भविष्य सहारे,स्वेता लाडे,प्रीती आत्राम,आदित्य उईके,हार्दीक जांभुळकर,मयुरी ठलाल, कुणाल मानकर,चंदू लाडे, विनय नाकाडे,दीपाशु चौरीकर यांच्यासह आंधळी, नवरगाव,वाघेडा,बेलगाव,खैरी, मालदुगी व घाटी या सातही गावांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बससेवा गरजेची👇
विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास आणि त्यांचे शिक्षण अधिक सुलभ होण्यासाठी सातही गावांना जोडणारी नियमित बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्राम बाल संरक्षण समिती व बाल पंचायतच्या वतीने करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या या मागणीची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी अपेक्षा उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थांनी व्यक्त केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात एकजण ठार; दुपारच्या घटनेने भीतीचे वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-गावालगतच्या परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्धाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार १६ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास सावली...

भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांवर उच्चस्तरीय समितीसमोर पूर्व विदर्भातील परीक्षार्थींनी मांडल्या अडचणी,अपेक्षा व सूचना..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(एमपीएससी) परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासह राज्यातील शासकीय भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित,विश्वासार्ह आणि उमेदवारकेंद्रीत करण्याच्या दृष्टीने आज बुधवारी...

प्रत्येक दुर्दैवी मृत्यूनंतर थेट डॉक्टरांना दोषी ठरवण्याऐवजी आजाराचे गांभीर्य समजून घेणे अत्यंत आवश्यक- जिल्हा शल्य चिकित्सक -डॉक्टरांकडून नवजात बालकाचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे वैद्यकीय प्रयत्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे दाखल झालेल्या एका क्षयरोगग्रस्त जोखमीच्या गरोदर मातेची तातडीने यशस्वी शस्त्रक्रिया करून मातेचा जीव वाचवण्यात...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘गोंडवानाचा महायोध्दा: क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ नाटकातील नाट्यांश विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातील प्रसिध्द नाटककार तथा महाराष्ट्र शासन पुरस्कृत साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या मधुश्री प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या व संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!