Sunday, June 7, 2026
Homeनागपूरसहलीच्या आनंदावर विरजण; तिघांचा नदीत बुडून मृत्यू..

सहलीच्या आनंदावर विरजण; तिघांचा नदीत बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-मोठ्या आनंदात कौटुंबिक सहलीचा बेत आखला आणि दिवस ठरला तो सुट्टीचा.पण,क्षणातच कौटुंबिक सहलीच्या आनंदावर विरजण पडल्याची दुःखद घटना आज,रविवार ७ जून रोजी दुपारच्या सुमारास नागपूर जिल्ह्याच्या कामठी परिसरातील कन्हान नदी पात्रात घडली.घडलेल्या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील तीन जणांचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला.चैतन्य बबलू अंबादे वय ६ वर्षे,रा.इंदिरा नगर, जरिपटका,नागपूर,गौतम राजकुमार अंबादे वय ३१ वर्षे रा.जरिपटका,नागपूर व रोहित नागदेवे वय ३३ वर्षे, रा.कुंभारे कॉलनी,कामठी,नागपूर अशी कन्हान नदी पात्रात बुडून मृत पावलेल्या तिघांची नावे आहेत.हे तिघेही एकाच कुटुंबातील सदस्य होते. नागपूरच्या जरिपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरा नगर येथील नातेवाईक असलेले अंबादे आणि नागदेवे हे कुटंब आज रविवारची सुट्टी असल्याने कौटुंबिक सहलीसाठी जुनी कामठी पोलीस हद्दीच्या सैन्य दलाच्या परिसरातील शिवमंदिर परिसरात गेले होते.शिवमंदिर कन्हान नदीच्या पात्राला लागूनच आहे.दुपारच्या सुमारास दोन्ही कुटुंबांतील सदस्य स्वयंपाकाच्या तयारीत व्यस्त होते. याच दरम्यान,जरीपटका येथील केजी एक मध्ये शिकणारा सहा वर्षीय चिमुकला चैतन्य अंबादे हा नदीच्या पात्रात खेळण्यासाठी उतरला.खेळता-खेळता त्याचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात बुडू लागला. चैतन्यला बुडतांना पाहून त्याला वाचवण्यासाठी त्याचा काका गौतम अंबादे यांनी पाण्यात उडी घेतली.मात्र, गौतमला पोहता येत नसल्याने तोही पाण्यात बुडू लागला.सदरचा प्रकार जवळच उभे असलेल्या रोहित नागदेवे यांच्या लक्षात येताच त्यांनीही दोघांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली.पण,खोल पाण्याचा अंदाज न आल्याने रोहित नागदेवे यांचाही बुडून मृत्यू झाला.नदीकिनाऱ्यावर उपस्थित असलेल्या इतर लोकांनी आणि स्थानिक नागरिकांनी आरडाओरड करत मदतीचा प्रयत्न केला,परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.घटनेची माहिती मिळताच जुना कामठी पोलीस ठाण्याचे एपीआय मनीष हिवरकर आणि पीआय सागर भंडारी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने घटनेचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न लावता नदीच्या पात्रात उतरून शोधमोहीम राबवली व तिन्ही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले.त्यानंतर,मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले असून घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्याच्या मुख्य सचिवांकडून डिजिटल आउटडोर स्क्रीनची पाहणी करून अभिनव उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे मुख्य सचिव तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव राजेश अग्रवाल यांनी आज, रविवार ७ जून रोजी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने उभारण्यात...

आजपासून घरगुती स्वयंपाकाच्या गॅस दरात वाढ..!

उद्रेक न्युज वृत्त :-पेट्रोल,डिझेल आणि व्यवसायिक गॅसच्या दरवाढीनंतर आता घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.सदरची दरवाढ ही आज,रविवार ७...

लॉजमध्येच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-लॉजमध्ये सुरू असलेल्या देहव्यापार अड्ड्याबाबत स्थानिक नागरिकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती.अश्यातच डोक्यावरून पाणी...

मान्सून कोकणात दाखल; पण सर्वत्र सक्रिय नाही.. – शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे.मात्र, त्यानंतर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!