Tuesday, April 21, 2026
Homeगडचिरोलीसर्वात मोठी कारवाई...१६ रेती तस्करांना अवैध रेतीचा उपसा प्रकरणी अटक- आरमोरी तालुक्यातील...

सर्वात मोठी कारवाई…१६ रेती तस्करांना अवैध रेतीचा उपसा प्रकरणी अटक- आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी येथील घटना- तीन कोटींच्या वर साहित्य जप्ती

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली : – जिल्ह्यात अवैधरीत्या रेती तस्करी मोठ्या प्रमाणावर फोफावली असून महसूल विभागातर्फे काही जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो तर काही जणांना जणूकाही सूट मिळाली की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यात अनेक रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेती तस्करीस मोठ्या प्रमाणावर उधाण आले आहे.अशातच आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी येथील खोब्रागडी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर रेतीचा अवैध उपसा आणि वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी,उपनिरीक्षक दीपक कुंभारे,राहुल आव्हाड आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी १४ मार्च २०२३ च्या रात्री घटनास्थळी धाड टाकली.काही जण ट्रक आणि टिप्परसह जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने रेती उपसा करीत असल्याचे निदर्शनास आले.त्यानुसार १६ जणांना अटक करून ३ कोटी ३० लाख ४० हजारांची वाहने व अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले.याप्रकरणी न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.रेती तस्करांवर पोलिसांनी केलेली गडचिरोली जिल्ह्यातील सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे.

सदर कारवाई दरम्यान १) निखील शंकरराव भुरे, वय ३५ वर्ष, रा.वाठोडा, ता.जिल्हा नागपूर २) राहुल बाजीराव घोरमोडे, वय ३० वर्ष, रा.बेटाळा,पो.किनी, ता.ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर ३) सोनल नानाजी उईके, रा. डोंगर तमाशी, ता. आरमोरी, जिल्हा गडचिरोली ४) धनंजय यशवंत मडावी, रा. डोंगर तमाशी, ता. आरमोरी, जिल्हा गडचिरोली ५) यशवंत महादेव मडकाम, रा. कुरडीमाल, ता. आरमोरी, जिल्हा गडचिरोली ६) नितेश उमेशजी मालोदे, वय ३० वर्ष, रा. निलज, ता. पवणी, जिल्हा भंडारा ७ ) अफसर अनवर शेख, वय २६ वर्ष, रा. ता. भिवापूर, जिल्हा नागपूर ८) अब्दुल राजीक मो. इस्माईल, वय ५४ वर्ष, रा. कलीम कॉलनी, अमरावती ९) अत्ताउल्ला खॉन रियाज उल्ला खॉन, वय ३० वर्ष, रा. लालखडी, अमरावती १०) नरेश तुकाराम ढोक, वय ३४ वर्ष, रा. ता. भिवापूर, जिल्हा नागपूर ११) नासीर नाजीम शेख, वय १९ वर्ष, रा. बिडगाव ताजनगर, ता. कामठी जिल्हा नागपूर १२) संतोष ज्ञानेश्वर पवार, वय २८ वर्ष, रा. तळेगाव ठाकुर, ता. तिवसा, जिल्हा अमरावती १३) शेख वसीम शेख जलील, वय २८ वर्ष, रा. मंगरुड दस्तगिर, ता. धामनगाव, जिल्हा अमरावती १४) निखील गोपाल सहारे, वय २३ वर्ष, रा. विरली, ता. लाखंदुर, जिल्हा भंडारा १५) जावेद जमीर खॉन, वय २८ वर्ष, ह. मु. पांढूरना, बहादुरा फाटा, नागपूर ता. जि. कायमचा पत्ता रा. ओलंग, जिल्हा लात्तेहार (झारखंड) १६) शाम मनसाराम चौधरी, वय ३५ वर्ष, रा. कोरदा, ता. नागभिड, जिल्हा चंद्रपूर असे एकुण १६ इसमांना ताब्यात घेवून पोलीस स्टेशन आरमोरी येथे दिलेल्या कायदेशीर फिर्यादीवरुन अप.क्र. ७५/२०२३ कलम ३७९, ३४, २०१ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सर्वात मोठी कारवाई मानली जात असली तरी आरमोरी महसूल विभाग याबाबत अनभिज्ञ कसे?अवैध रेती उपसा बाबत महसूल विभागास साधी कानकुनही न लागणे म्हणजे कुठेतरी पाणी मुरल्या गेले असावे; अशी शंका-कुशंका बळावली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत ३ हजारापेक्षा अधिकच्या रुग्णालयांचे जाळे; आज ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकरिता विकसित करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीचे आज, मंगळवार २१ एप्रिल रोजी लोकार्पण करण्यात आले.यात राज्यामध्ये कार्यरत असणाऱ्या...

आंघोळ करून शाळेचा गणवेश परिधान करणार! तेवढ्यातच कोसळला खाली.. – शालेय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अध्यक्षा वसुमना पंत यांनी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू करून सकाळी ११...

आता पोलिसांनाही हेल्मेटची सक्ती.. – विना हेल्मेट फोटो वा व्हिडीओ व्हायरल झाल्यास घेतली जाणार गंभीर दखल..

उद्रेक न्युज वृत्त :-कोणतेही नियम वा एखाद्या कायद्याची सक्ती ही सर्वप्रथम सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू करण्यात येते.मात्र,जे नियम वा सक्ती तुम्ही दुसऱ्यांना सांगता त्याच्या अंमलबजावणीची...

दिव्यांगांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी करुन एकाच छताखाली विविध शासकिय योजनांचा लाभ घ्यावा.. -देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण, पुनर्वसन व सक्षमीकरणासाठी स्वतंत्रपणे कार्य करण्याच्या उद्देशाने दिव्यांग कल्याण विभागाची स्थापना १५ डिसेंबर २०२२ रोजी करण्यात आली.स्वतंत्र विभाग स्थापन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!