Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसरकार नवनवीन प्रयोग आणतोय; पण.. आता रोजगार हमी योजनेतील मजुरांची उपस्थिती चेहऱ्याचे...

सरकार नवनवीन प्रयोग आणतोय; पण.. आता रोजगार हमी योजनेतील मजुरांची उपस्थिती चेहऱ्याचे स्कॅन करून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- ‘रोजगार हमी काम कमी अन् दुखणा जास्त’ असे असले तरीही ग्रामीण भागातील कामगारांना रोजगार मिळून उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होत आहे. अश्यातच बऱ्याच ठिकाणी रोजगार हमीच्या कामांवर बोगस मजूर तसेच गैरप्रकार उघडकीस आल्याने सरकार वेगवेगळे प्रयोग करून आळा घालण्याचा प्रयत्न करीत आहे.मात्र,गैरप्रकार करणारे सरकारच्या चार पट दिमाक लावून पायवाटा शोधत असतात.त्यातच शासनाने पुन्हा एकदा बोगस मजूर तथा गैरप्रकार रोखण्यासाठी नवीन फंडा सुरू केला आहे.नव्या प्रयोगात रोजगार हमीच्या कामांवर जाणाऱ्या मजुरांची उपस्थिती आता चेहऱ्याचे स्कॅन करून केली जात आहे.रोजगार हमी योजनेच्या पोर्टलवरील एनएमएमएस प्रणाली वापरून कामगारांची उपस्थिती आता फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून नोंदवली जाणार आहे.काम सुरू होण्यापूर्वी मजुराचा फोटो एनएमएमएस ॲपद्वारे घेतला जाईल आणि तो आधार डेटाशी त्वरित जुळवला जाईल.ज्या मजुरांची ओळख यशस्वीरित्या जुळेल,त्यांचीच उपस्थिती मान्य केली जाणार आहे.या उपक्रमामुळे रोजगार हमी योजनेत अनेक वर्षांपासून दिसणाऱ्या त्रुटींना आळा बसून योजना अधिक प्रभावी,पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीने राबवली जाईल.या नव्या प्रणालीमुळे रोजगार हमी योजनेतील बोगस कामगार व गैरप्रकारांना आळा बसून पारदर्शकता वाढेल.केवळ पात्र आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या मजुरांनाच मजुरी मिळेल,असे शासनाचे म्हणणे आहे.एखाद्या मजुरांनी अद्याप आपली ई-केवायसी पूर्ण केली नसेल,तर त्यांची उपस्थिती पुढे नोंदवली जाणार नाही.त्या-त्या गावातील मजुरांनी सदरच्या प्रक्रियेसाठी रोजगार सेवकांशी संपर्क साधावा,असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!