Wednesday, July 15, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा आरपीआय पदाधिकाऱ्यांच्या वतीने सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध..

कुरखेडा आरपीआय पदाधिकाऱ्यांच्या वतीने सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-सर्वोच्य न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा कुरखेडा तालुका रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवित कुरखेडा तहसील कार्यालयाचे नायब तहसिलदार राजकुमार धनबाते यांच्या मार्फतीने देशाचे राष्ट्रपती व पंतप्रधान यांना निवेदन सादर करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या दालनात एका प्रकरणात खटला सुरु असतांना राकेश किशोर तिवारी नामक वकिलाने सरन्यायाधीश भुषण गवई यांच्या दिशेने पायात घातलेला जुता काढून भिरकावण्याचा प्रयत्न केला होता.सर्वोच्य न्यायालयाच्या दालनात तेही सरन्यायाधीशांच्या बाबतीत असे कृत्य घडणे हे अशोभनीय व अतिशय निंदनीय आहे.काहीजण
जाती-पंतांच्या नावाखाली मी पणा दाखवून इतर बाबिंवरील जनतेची मने भटकविण्याचा प्रयत्न करीत आहेत.अश्यांना त्यांची जागा दाखविणे आवश्यक आहे. प्रकरणी कुरखेडा तहसिल कार्यालय परिसरात आरपीआयचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांच्या नेतृत्वात नायब तहसिलदार यांना निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध करण्यात आला व दोषीवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली.
निवेदन सादर करतेवेळी रिपाई जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर,जिल्हा उपाध्यक्ष मारोती भैसारे,दशरथ साखरे, ताराचंद नंदेश्वर आरमोरी तालुका अध्यक्ष,सोनु साखरे, मुक्ताजी दुर्गे,जिल्हा सरचिटणीस सुनिल सहारे,कुरखेडा तालुका अध्यक्ष प्रमोद सरदारे युवा अध्यक्ष संतोष खोब्रागडे,जेष्ठ नेते चरण कऱ्हाडे, जिल्हा उपाध्यक्ष डोमाजी नंदेश्वर,मंगेश बन्सोड,मोरेश्वर राऊत,धम्मदिप लाडे,नाजुक भैसारे,दादाजी रामटेके बालक भानारकर, मंगेश भानारकर मुर्लीधर कसारे यांचेसहित बहुसंख्य रिपाई पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!