Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीसंपूर्ण राज्यात ‘महारेशीम अभियान-२०२६’.. - रेशीम शेतीची लागवड करून लाखो रुपयांच्या अनुदानाची...

संपूर्ण राज्यात ‘महारेशीम अभियान-२०२६’.. – रेशीम शेतीची लागवड करून लाखो रुपयांच्या अनुदानाची संधी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती गावपातळीवर पोहोचविण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालय आरमोरी यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘रेशीम रथ’चा शुभारंभ १० फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आला.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांच्या हस्ते तसेच मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त समिर डोंगरे यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून या जनजागृती मोहिमेची सुरुवात करण्यात आली.यावेळी रेशीम विकास अधिकारी ए.व्ही.वासनिक,वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक जी.आर.उईके,क्षेत्र सहाय्यक ए.एन.नाखले, सी.व्ही.विठ्ठले आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग विभाग व रेशीम संचालनालय,नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात ‘महारेशीम अभियान-२०२६’ राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत रेशीम उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी १० फेब्रुवारी २०२६ ते ५ मार्च २०२६ या कालावधीत नोंदणी करणे आवश्यक आहे.
टसर रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी नोंदणी पूर्णपणे नि:शुल्क असून तुती लागवडीस पात्र शेतकऱ्यांना १ एकर क्षेत्रासाठी केवळ ५०० रुपये नोंदणी शुल्क भरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागणार आहे.रेशीम उद्योग हा शेतीआधारित असल्याने शेतकरी स्वतःच्या शेतीवर किटक संगोपन करून कोष उत्पादनातून थेट उत्पन्न मिळवू शकतात.या माध्यमातून वर्षाकाठी सुमारे १.५० ते २.०० लाख रुपये निव्वळ नफा मिळू शकतो,अशी माहिती रेशीम विकास अधिकारी ए.व्ही.वासनिक यांनी दिली.
केंद्र पुरस्कृत ‘सिल्क समग्र-२’ योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना १ एकर तुती लागवडीसाठी तुती रोपे,सिंचन संच,किटक संगोपन गृह,संगोपन साहित्य व निर्जंतुकीकरण औषधे यासाठी एकूण रुपये ३,७५,००० पर्यंत अनुदान देण्यात येते.तसेच ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना(पोकरा)’ अंतर्गत समाविष्ट गावांतील शेतकऱ्यांना रुपये ३,२५,१२५ इतके अनुदान उपलब्ध आहे.
‘महारेशीम अभियान-२०२६’ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालय,आरमोरी यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा रेशीम कार्यालय,देसाईगंज रोड, आरमोरी,जि.गडचिरोली येथे संपर्क साधावा,असे कळविण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!