Tuesday, October 20, 2026
Homeगडचिरोलीशेतात धान कापण्यासाठी गेली ती परतलीच नाही; वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

शेतात धान कापण्यासाठी गेली ती परतलीच नाही; वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातून ऐन सणाच्या दिवशीच धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.शेतावर धान कापणीसाठी गेलेल्या वृध्द महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २० ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास एटापल्ली तालुक्याच्या इरपनपायली येथे उघडकीस आली.बिलाशी आनंद बा वय ७० वर्षे असे मृतक वृध्द महिलेचे नाव असून बिलाशी या काल सोमवारी गाव नजीकच्या जंगल परिसरालगतच्या शेतावर धान कापणीसाठी गेल्या होत्या.दिवसभरातील कामे आटोपून सायंकाळ झाली तरीही त्या घरी परतल्या नव्हत्या.त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला.पण,त्यांचा कुठेही थांगपत्ता लागलेला नव्हता.अश्यातच आज सकाळी शेतापासून काही अंतरावर जंगल परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे,यापूर्वी १७ ऑगस्टला दोलंदा येथील हरी वड्डे नामक शेतकऱ्याला वाघाने ठार केले होते.घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला व मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.बिलाशी बा यांना पती,तीन मुले आणि नातवंड असा परिवार आहे.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरातील नागरिकांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली सायबर कमांडो पथकाची उल्लेखनीय कामगिरी.. -हरवलेले तब्बल ६ लाख रुपये किंमतीचे २१ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विजयादशमी हा सण सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईट प्रवृत्तींवर विजय मिळविण्याचा संदेश देतो.याच शुभमुहूर्तावर आज गडचिरोली पोलीस स्टेशनने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद...

देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा.. -दहा दिवसांत निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-सन २०२६ च्या खरीप हंगामात अनियमित पाऊस,वाढते तापमान,वादळ,कीड व रोगांचा प्रादुर्भाव तसेच वन्यप्राण्यांमुळे धान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर देसाईगंज...

‘तिच्या’ त्रासाला अन् वादाला वैतागला; शिक्षकाने केली प्रेयसीची हत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध असलेल्या प्रेमाचा शेवट अखेर प्रेयसीच्या हत्येने झाल्याची घटना नुकतीच चंद्रपुरात उघडकीस आली.प्रेयसीच्या हत्येप्रकरणी आरोपी शिक्षकास अटक करून...

आज दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचा संदेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या स्मृतींना उजाळा देणारा ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!