उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर (मूल) :- मूल तालुक्यातील मोरवाही येथील महिला देवकाबाई पत्रु झरकर सकाळच्या सुमारास शेतातील लाखोरी काढण्याकरिता गेली असता अस्वलाने दुपारच्या सुमारास अचानकपणे हल्ला चढविल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे.सदर घटना आज १३ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली.
दुपारच्या सुमारास महिला शेतात काम करीत असतांना अचानकपणे अस्वलाने महिलेवर प्राणघातक हल्ला केला.महिलेने आरडाओरड केल्याने अस्वल पळून गेली.त्यामुळे महिला थोडक्यात बचावली आहे.सदर घटनेची माहिती कुटुंबियांना होताच; त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर
महिलेला मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.परिसरात सुरुवातीला वाघांचा धुमाकूळ सुरू होता; मात्र आता अस्वलाने हल्ला चाढविल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वनविभागाने सदर घटनेविषयी दुर्लक्ष न करता तात्काळ अस्वल व वाघांचा बंदोबस्त करावा.अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे.