उद्रेक न्युज वृत्त
नागपूर:- कित्तेक वेळाआगारातून बस निघण्यापूर्वी देखभाल दुरुस्ती कडे महामंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याने कधी रस्त्यातच बसचे बिघाड होते; तर कधी कोणती अनुचित घटना होणार याचा काही नेम नाही.त्यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला येऊन खासगी प्रवास सुखकर असल्याची प्रचिती हल्ली दिसून येत आहे.अशातच नागपूर-अमरावती मार्गावर आज ४ एप्रिल ला सकाळी ९ वाजेच्या सुमारास चित्तथरारक घटना घडली असून शिवशाही बसला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.बस जळून खाक होण्यापूर्वीच प्रसंगावधान साधत बस मधील १६ प्रवाशांनी क्षणाचाही विलंब न लावता खाली उतरल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
नागपूर येथील गणेशपेठ आगारातून सकाळी ९ च्या सुमारास शिवशाही बस नागपुरातून अमरावतीला निघाली होती. शिवशाही बस नागपूर-अमरावती महामार्गावर कोंढाळी नजीकच्या साईबाबा मंदिराजवळ आली असता सदर बसला अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.आग लागताच बसमधील १६ प्रवाशी पटापट खाली उतरू लागले.प्रवाशी खाली उतरताच बसणे रौद्ररूप धारण करून संपूर्ण बस जळून खाक झाली.बसणे पेट घेताच बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्याने काही काळ मार्गावरील वाहतूक खोळंबली होती.