उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- १४ डिसेंबर २०२२ अन्वये शासननिर्णयानुसार काही खेळाडूंचे फेडरेशन कप स्पर्धांचे गुणांकन होत नसल्या कारणाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षाकरीता अर्ज सादर करू शकले नाहीत.यास्तव त्यांचे नुकसान होऊ नये व सदर खेळाडू पुरस्कारापासून वंचित राहू नये.याकरीता अशा खेळाडूंनी (शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरीता पात्र खेळांमधील ज्या खेळांच्या फेडरेशन कप स्पर्धा होतात;असे सहभागी/प्राविण्यप्राप्त खेळाडू फक्त) त्यांचे प्रस्ताव व विहीत नमून्यातील अर्ज ( खेळाडू) ३१ मार्च २०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेt संबंधित जिल्ह्यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे सादर करावेत.असे क्रीडा विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे.