Monday, August 24, 2026
Homeनागपूरशिक्षकाने अभ्यास वा शिस्तीकरिता रागावणे म्हणजे विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केले,असे म्हणता येणार...

शिक्षकाने अभ्यास वा शिस्तीकरिता रागावणे म्हणजे विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केले,असे म्हणता येणार नाही- उच्च न्यायालय -शिक्षकाविरोधातील गुन्हा रद्द; विद्यार्थ्याचे गळफास लावून आत्महत्या केल्याचे प्रकरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शिक्षण घेत असतांना एखादेवेळी शिक्षक कुठल्यातरी कारणावरून रागावून शिक्षा देतात, जेणेकरून विद्यार्थ्यांनी त्यातून बोध घेऊन पुनश्च तीच कृती वारंवार करू नये.पण एखादा विद्यार्थी मनात वेगळीच भावना ठेऊन अनावश्यक कृत्य करून शिक्षकांना दोष दिले जाते.मात्र,मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. शिक्षकाने अभ्यास किंवा शिस्तीकरिता रागावणे म्हणजे विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केले,असे म्हणता येणार नाही.शिक्षकाने वापरलेले शब्द चुकीचे आणि आक्षेपार्ह असले,तरी सामान्य बुद्धीचा कोणताही विद्यार्थी आत्महत्येसारखे एवढे मोठे टोकाचे पाऊल उचलणार नाही.मृत विद्यार्थी अतिसंवेदनशील होता आणि त्याने भावनांच्या भरात स्वतःचे जीवन संपवले.त्याने अशी कृती करावी हा शिक्षकाचा हेतू नव्हता,असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांनी देत शिक्षकाविरोधातील गुन्हा अवैध ठरवून रद्द केला.गोपाल सूर्यवंशी,असे शिक्षकाचे नाव असून ते बुलडाणा जिल्ह्यातील लखनवाडा,खामगाव येथील रहिवासी आहेत.सदरची घटना १ जुलै २०२५ रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील वासाडी (बु.)येथील जय बजरंग शाळेत घडली.शिक्षकाने वर्गात शिकवत असतांना विद्यार्थी विवेकला विज्ञानातील एका संकल्पनेची व्याख्या विचारली.विवेकला त्याचे उत्तर देता आले नाही.त्यामुळे शिक्षकाने त्याला उठाबशा काढायला सांगितल्या. विवेकने काही उठाबशा काढल्यानंतर पायाला दुखापत असल्याचे सांगत अधिक उठाबशा काढण्यास नकार दिला.त्यामुळे सूर्यवंशी यांनी संतापून त्याला अत्यंत कडक शब्दांत सुनावले.या अपमानास्पद वागणुकीमुळे दुखावलेला विवेक शाळेच्या मधल्या सुट्टीत घरी निघून गेला आणि त्याने स्वतःच्या शेतातील एका पडक्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली.त्याच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये शिक्षकाच्या वाईट वागणुकीचा उल्लेख होता.त्यावरून पोलिसांनी शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला होता.शिक्षकाने विद्यार्थ्याचा सातत्याने मानसिक छळ केला होता,ज्यामुळे विद्यार्थ्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरला नाही,असा कोणताही ठोस पुरावा समोर आला नाही.त्यामुळे शिक्षकाविरोधातील दाखल गुन्हा रद्द करून निर्दोष सुटका करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!