Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीशिकार करून चितळाची भाजी खाल्ल्या प्रकरणी चार जणांना वन कोठडी...

शिकार करून चितळाची भाजी खाल्ल्या प्रकरणी चार जणांना वन कोठडी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शेतात फासे टाकून चितळाची शिकार करून मांस शिजवून खाल्ल्या प्रकरणी वनविभागाला माहिती मिळताच वनविभाग पथकाने घटनास्थळावर धाड टाकून चार जणांना ताब्यात घेतल्याची कारवाई अहेरी तालुक्यातील वेलगूर ग्रामपंचायतस्थित बोटलाचेरू गावात केली.शंकर रामा आत्राम,किशोर मल्लेश सडमेक,मल्लेश येररा सडमेक,मुकेश कलमशाही मडावी सर्व रा.विजयपूर,ता.मुलचेरा अशी आरोपींची नावे आहेत.
 माहितीनुसार,सर्व आरोपींनी बोटलाचेरू गावालगत असलेल्या शेतात चितळाला फाशात फसवून शिकार केली.चितळाचे मांस शिजवून खाल्ल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनपथकाने घटनास्थळी पोहोचून चौघांना ताब्यात घेतले. वनविभाग नवेगाव क्षेत्रांतर्गत येत असलेल्या जंगल भागात चितळाचे वास्तव्य असल्याने चितळ खाद्याकरिता शेतात दाखल झाले.परंतु चितळ जाळे लावण्यात आलेल्या शेतात फसले.त्यामुळे शेतमालकाने चितळाची शिकार करून घरी नेले.त्यानंतर चितळाची भाजी बनवून खाल्ली.इतर तीन लोकांना बोलावून चितळाचे मांस त्यांना वाटप केली होती.त्यानुसार कारवाई करण्यात आली.ताब्यात घेण्यात आलेल्या चारही जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची वन कोठडी ठोठावण्यात आली. ताब्यात घेण्यात आलेल्या मांसाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तसेच वनविभागाने घटनास्थळावर पंचनामा करून चौकशीला प्रारंभ केला.प्रकरणात आणखी किती लोक समाविष्ट आहेत; याची चौकशी सध्या सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!