Monday, August 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशासन निर्णयात जरी पोपट पक्षीचा उल्लेख नसेल; तरीही एखाद्याला नुकसान भरपाईपासून वंचित...

शासन निर्णयात जरी पोपट पक्षीचा उल्लेख नसेल; तरीही एखाद्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवता येणार नाही.. – आता पोपट पक्षांनी नुकसान केल्यास मिळणार भरपाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्याने शेतात डाळिंबाची झाडे लावली.पण,अर्ध्याहून अधिकच्या झाडांची फळे ही पोपट पक्षांनी खाऊन नष्ट केली होती.अश्यातच शेतकऱ्याने कृषी विभागास माहिती देऊन पंचनामा करून घेतला.मात्र,शेतकऱ्यास कुठल्याही प्रकारची नुकसानभरपाई देण्यात आली नसल्याने संबंधित शेतकऱ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली.प्रकरणी न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फाळके आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्या खंडपीठाने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा दिला आहे.वन्यजीव संरक्षण कायद्यातील ‘वन्य प्राणी’ या संज्ञेत पोपटांसारख्या पक्ष्यांचाही समावेश होतो.परंतु,संबंधित शासन निर्णयात(जीआर)जारी पोपट पक्षाचा उल्लेख नसेल; तरीही एखाद्याला नुकसानभरपाईपासून वंचित ठेवता येणार नाही; असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले.
वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील हिंगी गावातील शेतकरी महादेव डेकाटे यांनी दीड एकर शेतात सुमारे ८०० डाळिंबाची झाडे लावली होती.पोपटांच्या थव्यांनी २०१६ मध्ये फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. त्यामुळे शेतकऱ्याला सुमारे २० ते २५ लाखांचे नुकसान झाले.दरम्यान,कृषी अधिकाऱ्यांच्या पंचनाम्यातही ५० ते ५५ टक्के फळे पक्ष्यांमुळे नष्ट झाल्याची नोंद केली होती, असा दावा केला.राज्य सरकारने संबंधित शासन निर्णयात पोपटांसारख्या पक्ष्यांमुळे झालेल्या नुकसानीबाबत भरपाईची तरतूद नसल्याचे सांगत नुकसानभरपाई देण्यास नकार दिला होता.केवळ काही विशिष्ट वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीसाठीच भरपाई देता येते,असा युक्तिवाद शासनाने केला.त्यावर, शासन निर्णय  हा केवळ प्रशासकीय परिपत्रक असून तो कायद्यापेक्षा वरचढ ठरू शकत नाही,असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले.तसेच, न्यायालयाने शेतकऱ्याची याचिका मंजूर करत २०१० रोजीच्या जीआरनुसार २०० डाळिंब बागेच्या नुकसानीसाठी प्रती झाड २०० रुपये प्रमाणे एकूण ४० हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.शेतकऱ्यातर्फे ॲड.अभय सांबरे यांनी,तर राज्य शासनातर्फे मुख्य सरकारी वकील,वरिष्ठ विधिज्ञ देवेन चौहान यांनी बाजू मांडली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!