Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीशासकीय कार्यालये खर्रा,तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी लाल भडक..-यावर त्वरित आळा घालणे आवश्यक…

शासकीय कार्यालये खर्रा,तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी लाल भडक..-यावर त्वरित आळा घालणे आवश्यक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- शासकीय कार्यालयांमध्ये तंबाखू, गुटखा खाणे आणि थुंकणे कायद्यान्वये गुन्हा आहे. मात्र कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी तसेच विविध कामांसाठी येणारे नागरिक खर्रा,तंबाखू खाऊन कार्यालयाचे कोपरे लाल करीत आहेत.

नुकतेच जि.प.च्या सीईओ आयुषी सिंह यांनी कार्यालयात खर्रा खाऊन येणाऱ्या कर्मचारी व नागरिकांवर कारवाई केली असली तरी या कायद्याची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

गडचिरोलीकरांना प्रामुख्याने खर्राचे व्यसन आहे. एकूण लोकसंख्येच्या किमान ५० टक्के नागरिक खर्रा याचे सेवन करतात.खर्रा खाल्ल्यानंतर काही वेळातच थुकावे लागते.अशावेळी कार्यालयाची भिंत किंवा कोपऱ्यात पिचकाऱ्या मारल्या जातात.त्यामुळे 

भिंतींचा रंग लाल झाला आहे.तसेच अनेक बसण्याच्या ठिकाणीसुद्धा खर्रा खाऊन थुंकले जाते. भिंती रंगविण्यात नागरिकांबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे दिसून येते.जिल्हा परिषदेसारख्या मोठ्या कार्यालयातील कर्मचारी तर थेट दुसऱ्या मजल्यावरील खिडकीतून खाली दूरपर्यंत पिचकारी मारतात.त्यामुळे एखाद्याला रंग लागून ‘ये लाल रंग मला केला भंग’ असे होऊ शकते. 

गडचिरोली शहरातील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या पोर्चवर झाडे लावली आहे.या ठिकाणच्या कुंड्या खर्राच्या पिचकाऱ्यांनी लाल झाल्या आहेत.तसेच अपंगांसाठी असलेल्या पायऱ्यांवरही धुंकून ठेवले आहे.तसेच कॉम्प्लेक्स येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातही हीच स्थिती आहे.काही कर्मचाऱ्यांकडून भिंतीचे कोपरे लाल केले जात असल्याने नागरिकही बिनधास्त खर्राच्या पिचकाऱ्या मारतात.अशांवर कडक कारवाई होण्याची नितांत आवश्यकता आहे.ग्रामीण भागातील ९० टक्क्याहून अधिक नागरिकांना खरांचे व्यसन आहे. एका कुटूंबाचा किराणा पेक्षाही खर्रावर होणार खर्च अधिक असल्याचे दिसून येते.ग्रामीण भागातील नागरिक जेव्हा दवाखाना किंवा इतर शासकीय कार्यालयांमध्ये येतात तेव्हा ते खर्रा खाऊनच राहतात. थुंकण्यासाठी जागा शोधतात.खर्रा खाणारे नागरिक पायऱ्यांच्या कोपऱ्यांवर थुंकतात.महिला रुग्णालयाच्या पायऱ्यांच्या भिंती लाल झाल्या होत्या. शेवटी रुग्णालयाने आरसे लावले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!