संपादक/सत्यवान रामटेके
उद्रेक न्युज वृत्त :- सर्वसामान्य नागरिक वा जनतेला अजूनही कळलेले नाही की,कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी वा कर्मचारी हे आपल्यासाठी ‘साहेब’, ‘सर’ वा मॅडम नसतात; ते तर जनतेची कामे करणारी लोकसेवक असतात.आम्ही आहोत म्हणून ते आहेत; आमचे काम करण्यासाठीच ते बसले आहेत.फरक मात्र एवढाच की,आम्ही उन्हा-तानात काम करतोय तर ते खुर्चीवर बसून आरामदायक हवा घेत काम करतात.आम्ही त्यांना आदराने सर,मॅडम वा साहेब म्हणतो; म्हणूनच त्यांची कॉलर टाईट होत असते.काहीजण अजूनही साहेबगीरीच्या भ्रमात आहेत; मात्र त्यांना अजूनही कळलेले नाही की ‘ते’ जनतेचे लोकसेवक आहेत.
लोकसेवक तुमचे-आमचे कामे करण्यासाठीच बसलेले आहेत.अशांना दर महिन्याला त्याचेच तर वेतन(पगार) शासन देतेय.शासन आपल्या खिशातून पगार देतो काय? तर नाही.हे तुमच्या-आमच्या कडून ‘याची टोपी त्याच्यावर तर त्याची टोपी याच्यावर’ असे करूनच धिंच्याक-धीच्यांक करीत असतात.सध्याच्या घडीला कितीतरी शासकीय कार्यालये हल्ली कार्यरत आहेत. ज्यांची नावे सुध्दा अनेकांना माहिती नाहीत.मात्र अशी कितीही शासकीय कार्यालये कार्यरत असली वा त्या कार्यालयात कितीही मोठा अधिकारी व कर्मचारी पदावर असला तरीही ‘तो’ असा अधिकारी वा कर्मचारी हा जनतेचा लोकसेवकच गणला जातो.जो कुणी सरळ सेवा भरती,महाराष्ट्र लोकसेवा आयोग,केंद्रीय लोकसेवा आयोग वा इतर क्षेत्रातून कितीही प्रावीण्य मिळविला असेल तरीही ‘तो’ जनतेचा लोकसेवकच आहे.जनतेच्या सेवेसाठीच ‘तो’ खुर्चीवर विराजमान झालेला आहे.ज्याच्या अंगात साहेबगीरी असेल; असा अधिकारी,कर्मचारी घरी बसून ठण-ठण गोपाला केल्याशिवाय राहणार नाही.