उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- तुम्हाला हे ठाऊक आहे काय? शासकीय कार्यालयात हलचल पंजी किती महत्वाची आहे;तर मग जाणून घ्या…
हलचल पंजीमुळे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे शक्य होते.प्रत्तेक शासकीय कार्यालयात हलचल पंजी असणे आवश्यक आहे.हलचल पंजी दैनंदिन कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय कार्यालयात महत्वाची भूमिका बजावत असते.एखाद्या कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी वर्ग यांना कार्यालयातून बाहेर पडतांना व कार्यालयात परत येतांना हलचल पंजीवर नोंदी घेतल्या जातात.मात्र काही कार्यालये वगळता हलचल पंजीवर नोंदीच घेतल्या जात नसल्याने, कार्यालयातील अधिकारी वा कर्मचारी नेमके कुठे गेले हे कळतच नाही.त्यामुळे जनसामान्यांना कार्यालयात वारंवार हेलपाट्या माराव्या लागतात.
कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारणा केल्यास त्यांना सुद्धा माहिती नसते की,साहेबराव कुठे गेले.कित्तेक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अजूनही हलचल पंजी काय असते हे सुद्धा माहिती नाही.
त्यामुळेच शासकीय अधिकारी,कर्मचारी यातील कार्यालये केव्हा-केव्हा वाऱ्यावर गेल्यासारखी वाटतात.हलचल पंजीवर नोंद अजूनपर्यंत कित्तेक कार्यालयांनि घेतली नसल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळेच कार्यालयातून केव्हाही बाहेर पडणे,कुठेही जाणे,दौरे दाखविणे,अमुक काम सांगून कार्यालय सोडणे अशी बरीच कारणे दाखवून हात झटकल्या जात आहे.त्यामुळे अशी कारणे समोर येऊ नये व नेमके कोण कुठे गेले तसेच जनसामान्यांना वारंवार कार्यालयात हेलपाटे मारण्यास लागू नये यासाठी हलचल पंजी वर नोंदी घेणे आवश्यक आहे.याकरिता माहिती अधिकाराचा वापर करून शासकिय कार्यालयातील हलचल पंजी नोंदवहीची माहिती घ्या व एखादे कार्यालयात गेल्यावर अधिकारी,कर्मचारी उपस्थित नसल्यास हलचल पंजी नोंदवही तपासा.