Saturday, June 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशक्यतो उपाशीपोटी चहा,कॉफी पिणे टाळावे... - नाहीतर भोगावे लागणार गंभीर परिणाम...

शक्यतो उपाशीपोटी चहा,कॉफी पिणे टाळावे… – नाहीतर भोगावे लागणार गंभीर परिणाम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-चहा आणि कॉफी या दोन्हींचे दूरदर्शी विपरीत परिणाम असतात.वारंवार उपाशीपोटी चहा किंवा कॉफी घेतल्यानंतर पचनक्रिया मंदावते.तसेच भूक लागण्याचे प्रमाण कमी होत राहते.अनेक लोक भूक टाळण्यासाठी चहा पितात.मात्र,यामुळे भूक व आहार आणखी कमी होतो.सकाळी उपाशीपोटी चहा घेतल्यानंतर पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊन पोटात गॅस तयार होते.
अनेकांना सकाळी उठल्यावर उपाशीपोटी चहा,कॉफी पिण्याची सवय आहे.सकाळी उठले की,चहा, कॉफीचा कप हातात पडतो.लहान मुलेही मोठ्यांचे बघून सकाळी झोपेतून उठल्यानंतर चहा घेतात.मात्र, या चहा-कॉफीचे दुष्परिणाम आहेत.उपाशीपोटी चहा घेतल्यानंतर पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊन पोटात गॅस तयार होतो.चहा,कॉफी पिल्याने अनेकांना ताजेपणा अनुभवास येतो.मात्र,त्यामुळे पोटाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.तज्ज्ञ म्हणतात, सकाळी उपाशीपोटी चहा,कॉफी पिणे हानिकारक आहे.डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार,उपाशीपोटी चहा व कॉफी घेऊ नये; यापेक्षा दूध व फळे घेतल्यास उत्तम होईल.चहा किंवा कॉफी घेणे शक्यतो टाळावे.हे शक्य नसेल तर हे पेय नाश्त्यानंतर घ्यावेत.
डॉ.सौरभ रोकडे,पोटविकारतज्ज्ञ,भंडारा👇
सकाळी उपाशीपोटी चहा व कॉफी न घेता नाश्ता घेतला पाहिजे.त्यानंतर चहा किंवा कॉफी प्यावी. उपाशीपोटी चहा पिणे पूर्वापार सुरू आहे.मात्र,तरुण आणि विशेष करून बालकांनी या पेयापासून दूर राहिले पाहिजे.फक्त सवय म्हणून हे पेय पिणे धोक्याचे आहे.एकवेळ चहा,कॉफी घेणे चालू शकते.मात्र, उपाशीपोटी चहा-कॉफी घेणे आरोग्यास अतिशय हानिकारक आहे.शक्यतो चहा व कॉफी पिणे प्रत्येकाने टाळलेलेच बरे असते.नाहीतर गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!