उद्रेक न्युज वृत्त
कोंढाळा :-
राज्य व बाहेर राज्यातील सायबर क्राईम करणारे सक्रिय झाले असल्याने अशांपासून सावधगिरी बाळगणे आवश्यक झाले आहे.सायबर क्राईम करणाऱ्यांनी एक नवा ऑनलाईन फंडा अवगत केला असून आपणांस व्हॉट्स ॲप वरती एखादी लिंक पाठविणे वा एखादी ॲप्स पाठवून ती डाऊनलोड करण्यासाठी विविध प्रकारचे आमिष दाखविले जाते आहे.असे आमिष दाखविणाऱ्या चोरांपासून सतर्क राहावे.अन्यथा एका सेकंदात आपले बँक खात्यातील सर्व जमा-पुंजी गोठवल्याशिवाय राहणार नसल्याने फेक लिंक पासून सावधान रहावे.
सुरुवातीला केवळ युवक तरुण वा अज्ञात इसमांद्वारे मोबाईल वरती संपर्क करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात होता.मात्र हल्ली युवक तरुणी वा इतर यांच्याद्वारे मोबाइल वरून संपर्क साधून व गोड बोलून माहिती संकलित केल्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याने अशांपासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.अन्यथा एका सेकंदात आपल्या बँक खात्यातून रक्कम लंपास झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे काही सायबर क्राईम करणारे व्हाट्सएपच्या माध्यमातून लॉटरी लागल्याचे भासवून सर्व बँक खात्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करीत असतात.त्याच्रमाणें हल्ली एखादी लिंक पाठवून बँक खाते गोठविण्याचा प्रयत्न सुरू आहे.त्यामुळे कुठल्याही अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या लिंक वरती क्लिक करू नये व अशांच्या नादी न लागता त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देऊ नये; अन्यथा एकदा त्यांच्या जाळ्यात पडल्यास संपूर्ण बँक खात्यातील रक्कम गोठविल्याशिवाय राहणार नाही.