Tuesday, October 6, 2026
Homeनागपूरव्हॉट्सॲपवर आलेली अनोळखी लिंक उघडणे तरुणाला पडले महागात; लिंक उघडताच मोबाइल हॅक..

व्हॉट्सॲपवर आलेली अनोळखी लिंक उघडणे तरुणाला पडले महागात; लिंक उघडताच मोबाइल हॅक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाला व्हॉट्सॲपवर आलेली अनोळखी लिंक उघडणे चांगलेच महागात पडले आहे.लिंक उघडताच मोबाइल हॅक झाला आणि सायबर चोरट्यांनी मोबाईल मधील डाटा व संपर्क क्रमांकाची यादी ताब्यात घेतली.त्यानंतर तरुणाच्या चेहऱ्याचा वापर करून अश्लील मॉर्फ फोटो तयार केले आणि ते नातेवाइक व परिचितांना पाठवून १५ हजार रुपयांची खंडणी मागितली.पैसे न दिल्यास हे फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली.या प्रकरणी तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार तरुण शीतपेय कंपनीच्या एजन्सीत काम करतो.काही दिवसांपूर्वी त्याच्या व्हॉट्सॲपवर अनोळखी लिंक आली होती.त्याने ती उघडताच मोबाइलमधील माहिती सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या हाती लागली. आरोपींनी संपर्क यादी मिळवल्यानंतर तरुणाच्या चेहऱ्याचा वापर करून अश्लील मॉर्फ फोटो तयार केले.हे फोटो त्याच्या परिचित आणि नातेवाइकांना पाठवण्यास सुरुवात केली.अचानक अशा प्रकारचे फोटो नातेवाइकांना पाठवले जात असल्याने तरुण घाबरला. त्याचदरम्यान दोन वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांवरून अज्ञात आरोपींनी त्याच्याशी संपर्क साधला.फोटो समाजमाध्यमांवर प्रसारित न करण्यासाठी १५ हजार रुपये देण्याची मागणी केली.पैसे न दिल्यास आणखी फोटो प्रसारित करण्याची धमकी दिली.प्रसंगी तरुणाने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.सायबर सेलच्या मदतीने अज्ञात ठकबाजांचा शोध घेतला जात आहे.विशेष म्हणजे,नागरिकांनी अनोळखी व्यक्तींनी मोबाईलवर पाठविलेली लिंक न उघडता समोरच्या व्यक्तीचा क्रमांक तात्काळ ब्लॉक करून घ्यावे, जेणेकरून कुठल्याही प्रकारची होणारी फसवणूक टाळता येईल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोरची तालुक्यातील सीताफळ-जांभूळ उत्पादनाला चालना देण्यासाठी रोपवाटिका,प्रक्रिया केंद्र व शीतगृह उभारावे.. -आमदार रामदास मसरामांची कृषी मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा मतदारसंघातील कोरची तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या सीताफळ व जांभूळ या फळपिकांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी तालुक्यात अद्ययावत रोपवाटिका,शेतकरी...

मंत्रिमंडळ निर्णय; आता पोलिसांच्या साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ योजना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावतांना जोखीम पत्करून केलेल्या साहसी कामगिरीसाठी ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ देण्याच्या योजनेस आज,मंगळवार ६ ऑक्टोंबर रोजी...

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी विशेष नैमित्तिक रजा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी येत्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे.या...

गडचिरोली जिल्ह्यातील खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याची सन २०२६-२७ या वर्षातील खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.चालू वर्षातील हंगामी पैसेवारी ही ६७ पैसे जाहीर करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!