Sunday, May 17, 2026
Homeनागपूरविहिरीत आढळला एक हात आणि डोका नसलेला सांगाडा..!

विहिरीत आढळला एक हात आणि डोका नसलेला सांगाडा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-बऱ्याच कालावधीपासून पडीक असलेल्या जागेतील विहिरीत एक हात आणि डोका नसलेला मानवी सांगाडा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.सदरची घटना आज,शनिवार ३० ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास गणेशपेठ हद्दीतील आग्याराम देवी मंदिराच्या काही अंतरावर असलेल्या परिसरात उघडकीस आली.नागपूरच्या सिव्हिल लाइन्स परिसरात वास्तव्यास असणारे देवेश प्रकाश सूचक यांच्या मालकीची जागा आग्याराम देवी मंदिराच्या काही अंतरावर असून यापूर्वी त्या ठिकाणी जिनिंग मिल होती.सदरची जिनिंग मिल काही कारणास्तव बंद पडल्याने देवेश सूचक यांनी २००८ मध्ये दिनेश सूचक यांना संपूर्ण जागा विकली होती.बऱ्याच कालावधीपासून जागा पडीक असल्याने आज शनिवारी दिनेश सूचक यांच्या कुटुंबियांकडून परिसरातील जागेची साफसफाई करणे सुरू असतांनाच आवारात असलेल्या विहिरीतून दुर्गंधी येऊ लागली. विहिरीत डोकावून बघितले असता मानवी सांगाड्यासारखे दिसून आल्याने याबाबत गणेशपेठ पोलिसांना माहिती देण्यात आली.त्यानुसार पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले.अग्निशमन दलाच्या  मदतीने अज्ञात व्यक्तीचा मानवी सांगाडा बाहेर काढण्यात आला.बाहेर काढण्यात आलेल्या सांगाड्याचा एक हात आणि डोका नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.सदरचा सांगाडा कुणाचा,कोणी मारून फेकला व किती दिवसांपासून त्या ठिकाणी होता,त्यासाठी फॉरेन्सिक पथकास पाचारण करून त्या दिशेने तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भाजप नेत्याच्या मुलाचा मृतदेह आढळला तलावात; परिसरात तणावपूर्ण वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खापरखेडा-नांदा मार्गावरील तलावात भाजप नेते रमेश लोढे यांच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.सचिन रमेश लोढे वय ३७ वर्षे,रा.वॉर्ड...

वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त :-वाढत्या महागाईने पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम केला आहे. युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागला आहे.घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीपासून...

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली; परीक्षार्थींसाठी सुधारित वेळापत्रक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टिईटी-२०२६ परीक्षा आता येत्या,रविवार २८ जून २०२६ रोजी होणार...

ठाणेगाव परिसरात वणव्याचे रौद्ररूप; शेतकऱ्यांच्या डोळ्यात दुःखाश्रू.. – आमदार रामदास मसराम शेतबांधावर..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव परिसराच्या शेतशिवारात काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या वणव्याने रौद्ररूप धारण करून परिसरातील शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.काहींनी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!