Wednesday, September 23, 2026
Homeधानोराविष प्राशन करून तरुणाने संपवले जीवन..-धानोरा तालुक्यातील घटना…

विष प्राशन करून तरुणाने संपवले जीवन..-धानोरा तालुक्यातील घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

धानोरा (गडचिरोली) :- धानोरा तालुक्यातील तोयागोंधी येथे एक विचित्र घटना घडली असून घरजावई व्हायची इच्छा नसल्याने एका युवकाने विष प्राशन करून जीवन संपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.सुधाकर महारू पोटावी वय २५ वर्षे असे मृत युवकाचे नाव असून त्याने काल रविवार ९ जून रोजी दुपारी टोकाचे पाऊल उचलले.

मिळालेल्या माहितीनुसार,मृत सुधाकर पोटावीचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते.पण तो घर जावई बनून आला; तरच लग्न…असा प्रस्ताव मुलीच्या घरच्यांकडून आला होता.त्यानुसार सुधाकरला त्याचे कुटुंबीय घरजावई म्हणून सुरसुंडी गावाजवळच्या शिवटोला येथे नेऊन देणार होते.परंतु त्याला घरजावई होणे पसंत नव्हते.

घरजावई होऊन शिवटोल्याला जाण्याच्या आदल्या दिवशी काल,रविवारी सुधाकर पोटावीने आपल्या शेतातून आंबे आणून घरी दिले.त्यानंतर दुपारी तो पुन्हा शेतामध्ये निघून गेला.सायंकाळी तोयागोंदी येथे वादळी पाऊस आल्याने सर्व लोक घरी आले.मात्र सायंकाळ झाली,तरी सुधाकर घरी आला नाही म्हणून त्याची चौकशी करण्यासाठी कुटुंबातील सदस्य शेतात गेले असता तो शेतात मृतावस्थेत आढळून आला. त्याला धानोरा ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले.त्यानंतर आज,सोमवार  १० जून रोजी सकाळी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह घरच्यांना सोपाविण्यात आला. या घटनेचा पुढील तपास धानोरा पोलिस करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!