Thursday, June 25, 2026
Homeनागपूरविश्वास कुणावर ठेवायचा? २५ लाखांची मागणी करणारा जवळचा मित्रच निघाला खंडणीखोर...

विश्वास कुणावर ठेवायचा? २५ लाखांची मागणी करणारा जवळचा मित्रच निघाला खंडणीखोर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका व्यक्तीने मुलगी शोधता-शोधता व्हॉट्सॲप कॉल केला आणि मुलीने सांगितल्याप्रमाणे केले.त्यानंतर सुरू झाली खरी कहाणी.खंडणी सोबतच ब्लॅकमेल करणारा जवळचा मित्र अन् मुलीचा नातेवाईक निघाला असल्याची घटना उघडकीस आली आहे.
प्रकरण असे की,एक व्यक्ती सायबर गुन्हेगारांच्या सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात फसला व त्यानंतर त्याच्या मित्रानेच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत २५ लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला आहे.पोलिसांच्या तपासातून आरोपी हा पीडित व्यक्तीचा मित्रच असल्याची बाब समोर आली आहे.सदरची घटना नागपुरातील अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.संबंधित व्यक्ती लग्नासाठी मुलगी शोधत होता व त्याने मॅट्रीमॉनिअल साईटवर नोंदणी केली होती.तेथून त्याला मार्च २०२२ मध्ये ‘सनम’ नावाच्या मुलीचा फोन आला.तिने लग्न करण्याची इच्छा प्रदर्शित केली व त्याला विश्वासात घेतले.त्यानंतर तिने त्याला व्हिडीओ कॉल करायला लावला व स्वतः कपडे काढत त्यालादेखील कपडे काढायला लावले.या प्रकाराचा व्हिडीओ तयार करत तिने त्याला व्हॉट्सॲपवर पाठविला व खंडणीची मागणी केली.पीडित व्यक्तीने सायबर पोलिस ठाणे गाठले व त्यांच्या सूचनेनुसार व्हॉट्सॲप क्रमांक ब्लॉक केला.त्यानंतर कुठलाही फोन किंवा मेसेज आला नव्हता.मात्र,सप्टेंबर महिन्यात एका क्रमांकावरून व्हिडीओ मिस कॉल आला व त्यावर ‘सनम’चे नाव लिहिले होते.त्याने फोन करत विचारणा केली असता समोरील व्यक्तीने तोच आक्षेपार्ह व्हिडीओ पाठविला.या प्रकाराची माहिती पीडित व्यक्तीने अनिरुद्ध मोतीराम डहाके वय ३९ वर्षे, इमामवाडा नावाच्या मित्राला दिली.अनिरुद्धने फोन हॅक झाला असण्याची शक्यता व्यक्त करत फोन तीन तासांसाठी स्वत:जवळ ठेवला.त्यानंतर पीडित व्यक्तीने परत व्हॉट्सॲप अनइन्स्टॉल केले होते.मात्र, अनिरुद्धच्या मोबाइलवर त्याने व्हॉट्सॲप सुरू केले. समोरील व्यक्ती २५ लाखांची मागणी करत असल्याचे अनिरुद्धने त्याला सांगितले.
अनिरुद्धच्या बोलण्यावरून पीडित व्यक्तीला संशय आला व त्याने मी पोलिसांत तक्रार केली असल्याचे त्याला सांगितले.यावरून अनिरुद्ध अस्वस्थ झाला व तुझी बदनामी होईल,असे म्हणाला,त्याच रात्री अनिरुद्धने त्याला भेटायला तुकडोजी चौकात बोलविले,तू तक्रार मागे घे,नाही तर तुझा व्हिडीओ मीच तुझ्या नातेवाइकांना पाठवतो,असे म्हणत त्याने जिवे मारण्याचीदेखील धमकी दिली.त्यानंतर त्याने मी स्वतः आत्महत्या करून घेईल व तुला तसेच तुझ्या मित्रांना फसवील,अशी भीतीदेखील दाखविली. पीडित व्यक्तीने दोन दिवसांनी अजनी पोलिस ठाण्यात संबंधित क्रमांकाच्या मालकाविरोधात तक्रार केली.तो क्रमांक एका महिलेचा निघाला.त्या महिलेची चौकशी केली असता ते सीम हरवल्याचे तिने सांगितले. चौकशीदरम्यान ती अनिरुद्धची नातेवाईक असल्याची बाब समोर आली.अखेर पीडित व्यक्त्तीने अनिरुद्धविरोधात पोलिसांत तक्रार केली.पोलिसांनी त्याच्याविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम २९६, ३०८ (२) व ३५१(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!