- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षांची सविस्तर वेळापत्रके महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत; असे स्पष्टीकरण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिले आहे.या परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत समाज माध्यमांतून प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती चुकीची असून,ती ग्राह्य धरण्यात येऊ नये; असे आवाहनही त्यांनी केले आहे.
काही संकेतस्थळांवरून फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांची वेळापत्रके जाहीर करण्यात आल्याबाबतची बातमी समाज माध्यमांतून प्रसारित झाली आहे.याबाबत मंडळाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.यानुसार समाज माध्यमांतून प्रसिद्ध करण्यात आलेली २०२५ फेब्रुवारी-मार्च च्या दहावी-बारावीच्या परीक्षांची
वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत.या परीक्षांची वेळापत्रके मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील, याची सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी नोंद घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे. संभ्रम निर्माण केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही म्हटले मंडळाने आहे.
- Advertisement -

