Saturday, October 3, 2026
Homeगडचिरोलीविविध चकमकींमध्ये सहभागी राहिलेल्या जहाल नक्षल्याने केले आत्मसमर्पण…

विविध चकमकींमध्ये सहभागी राहिलेल्या जहाल नक्षल्याने केले आत्मसमर्पण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- छत्तीसगड राज्यातील विविध चकमकींमध्ये सहभागी राहिलेल्या एका जहाल नक्षल्याने आज २८ मे रोजी गडचिरोली येथे केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले.गणेश गट्टा पुनेम वय ३५ वर्षे असे आत्मसमर्पित नक्षल्याचे नाव असून,तो छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील बेच्चापाल येथील रहिवासी आहे.

गणेश पुनेम हा २०१७ मध्ये छत्तीसगड राज्यातील भैरमगड भागातील नक्षल्यांच्या पुरवठा समितीत सहभागी झाला.२०१८ पर्यंत तो या समितीचा उपकमांडर होता.२०१७ मध्ये छत्तीसगडच्या मिरतूर आणि २०२२ मध्ये तिम्मेनार येथे झालेल्या चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता.महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आज गणेश पुनेम याने केंद्रीय राखीव दलाचे पोलिस उपमहानिरीक्षक जगदीश मीणा यांच्यापुढे आत्मसमर्पण केले.त्यानंतर त्याला गडचिरोली जिल्हा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.या प्रसंगी केंद्रीय राखीव दलाचे उप कमांडंट नितीन कुमार उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!