उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- महाराष्ट्र शासनाच्या विजनियामक आयोगाने १ एप्रिल २०२३ पासून अडीच रुपये प्रति युनिट दरवाढ करणार करणार आहे.पूर्वीच विद्युत बिल भरमसाट येत आहे.यामुळे गरीब जनता व सर्वसाधारण नागरिक त्रस्त आहेत.अशातच विद्युत बिल वेळेवर भरू शकत नाही.परत महाराष्ट्र शासनाने अडीच रुपये दरवाढ करून गोरगरीब मध्यम वर्गीय जणते वर अन्याय करीत आहेत.आजही गोरगरीब लोक विद्युत बिल वेळेवर न भरल्याने विद्युत विभागाचे अधिकारी विद्युत पुरवठा बंद करतात.अनेक गरीब लोक पैशाची जुळवा-जुळव करे पर्यंत अंधारात असतात.परत अडीच रुपये प्रति युनिट दरवाढ केल्याने गरीब मध्यम वर्गीय जनतेला अंधारात राहण्याची पाळी येऊ शकते. विद्युत दरवाढ महागाई कमी करायला पाहिजे तर वाढवणं सुरू आहे.महिलांना रोज स्वयंपाक करावे लागते तर गॅसचे भाव वाढवून अकराशे करून ठेवले आहे.जिथे दरवाढ कमी करायला पाहिजे तिथे दरवाढ कमी न करता एसटी बस मधे अर्धी तिकीट केली. एसटी बस ची तिकीट अर्धी केल्याने दैनंदीन गरज विद्युत दर वाढ गॅस दर वाढ वर परिणाम होणार आहे का? विद्युत दर वाढीच्या विरोधात शिवसेना महिला जिल्हा संघटिका छायाताई कुंभारे यांच्या नेतृत्वात शेकडो महिलाच्या उपस्थितीत आज २८ मार्च ला गांधी चौक गडचिरोली येथे निषेध करण्यात आले.
या प्रसंगी विद्युत दर कमी करा; नाही तर खुर्च्या खाली करा’ महाराष्ट्र शासनाचा निषेध असो’ असे नारे लावण्यात आले. जर दर विद्युत दर वाढ कमी झाली नाही तर शिवसेना महिला आघाडी तीव्र आंदोलन करेल; असा इशारा दिला.आंदोलनात महिला आघाडीचे जोत्सना राजूरकर, मंजुळा पदा,देवकी कंकड्यालवार,स्वाती दासेवर, आरती खोब्रागडे,स्मिता नैताम,सीमा पराशर,नूतन कुंभारे,संद्या हेमके,धनश्री पवार,शारदा वणकर,वंदना वाडगुरे,आशा देशमुख,निकिता वडगुरे,सुमन सोनटक्के,कमला बाई मोहुरले,चित्रा निकुरे,श्वेता शेंडे, ममता मेश्राम,नैना शेंडे,श्रीपदा मुसद्दिवर,शशिकला मुसद्दीवर,सूमीत्रा पारधी,नैना शेंडे,शांता मुंटावर शशीकला निकेकार,नैना सयाम,रोहिणी दीक्षित व शेकडो महिला उपस्थित होत्या.