Monday, August 17, 2026
Homeनांदेडविद्यार्थ्यांना शिकवत असतांना मुख्याध्यापकाने शाळेतच दारू ढोसली..अन् - बदनामीच्या भीतीने राहत्या घरीच...

विद्यार्थ्यांना शिकवत असतांना मुख्याध्यापकाने शाळेतच दारू ढोसली..अन् – बदनामीच्या भीतीने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नांदेड :-हल्ली जिकडे पहावे तिकडे दारू ढोसण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.कुणी दारू विक्रेत्याच्या घरी जाऊन पितो तर कुणी एखाद्या निर्जनस्थळी तर कुणी स्वतःच्या राहत्या घरी,बारमध्ये वा ज्यांना जमेल तसे दारू पिऊन धिंगाणा घालीत असतात.मात्र,ज्या गुरूकडून ज्ञानार्जन गिरविले जाते; अश्या गुरूकडून शिष्यांच्या समोरच दारू तीही शाळेतच ढोसली जात असेल तर..असाच काहीसा प्रकार उघडकीस आला आहे.जिल्हा परिषद शाळेच्या एका मुख्याध्यापकाने वर्ग सुरु असतांना विद्यार्थ्यांसमोर दारू ढोसल्याने,ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने बदनामीच्या भीतीने शिक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारच्या रात्री लोहा तालुक्यात घडली व काल गुरुवारी सर्वत्र उघडकीस आली.गोविंद ज्ञानोबा गायकवाड वय ५० वर्षे असे मृत शिक्षकाचे नाव आहे.

गोविंद गायकवाड हे लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते.बुधवारी सकाळी ते शाळेत गेले.विद्यार्थ्यांना शिकवत असतांना त्यांनी विद्यार्थ्यांसमोरच दारू ढोसली.हा प्रकार पाहून विद्यार्थी घाबरले आणि शाळेबाहेर आले.एका ग्रामस्थाने विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर का आले? याबद्दल विचारले असता,हा प्रकार उघडकीस आला.काही वेळातच इतर ग्रामस्थ देखील शाळेत दाखल झाले आणि या प्रकाराची माहिती गावकऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिली.
गटशिक्षणाधिकाऱ्याने या प्रकाराची दखल घेत तात्काळ तीन शिक्षकांना चौकशीसाठी शाळेत पाठवले.यावेळी मुख्याध्यापक गायकवाड हे दारूच्या नशेत आढळले.वर्गात एका थैलीमध्ये दारूची बॉटल आढळली.या साऱ्याचा पंचनामा तपासणीसाठी शिक्षकांनी केला.विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे जबाब त्यांनी नोंदवले.हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ही माहिती मिळताच मुख्याध्यापक गोविंद गायकवाड घरी गेले आणि त्याच रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.याप्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक गोविंद गायकवाड हे शाळेत मद्यप्राशन केल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी शाळेत गर्दी केली.यातील काही जणांनी मुख्याध्यापकाचे चित्रीकरण केले.मुख्याध्यापक गायकवाड यांना नीट बोलताही येत नव्हते.सायंकाळी गायकवाड आपल्या घरी माळाकोळी येथे परतले. घरातच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे काल गुरुवारी उघडकीस आले.बदनामी होईल या भीतीने त्यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!