- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील नांदगाव (जानी)शेत शिवारात आज,रविवार १६ मार्चला सकाळच्या सुमारास चित्तथरारक घटना उघडकीस आली आहे.वाघाचा बछडा आणि शेतकऱ्याची झुंज होऊन अखेर ४३ वर्षीय शेतकऱ्याने वाघाला पिटाळून लावले.मात्र,झालेल्या झुंजीत शेतकरी जखमी झाला. जखमी शेतकऱ्यास ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.गोवर्धन डांगे वय ४३ वर्षे,रा.नांदगाव (जानी),ता.ब्रम्हपुरी,जि.चंद्रपूर असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
माहितीनुसार,हल्ली शेतकरी बांधवांनी उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे.त्यातच गोवर्धन डांगे यांनी सुद्धा उन्हाळी धानपिकाची लागवड करून शेतीला मोटार पंपाद्वारे पाणी देण्यासाठी आज रविवारी सकाळच्या सुमारास आपल्या शेतावर गेले होते.अशातच शेतावर काम करीत असतांना अचानकपणे त्यांच्यासमोर एक वाघाचा बछडा(पिल्लू) समोरासमोर उभा येऊन राहिला.अचानकपणे वाघ समोर आल्याने डांगे यांची काहीकाळ घाबरगुंडी होऊन भंबेरी उडाली.तितक्यात वाघाच्या बछड्याने गोवर्धन यांच्यावर हल्ला चढवला. हल्ला चढवताच शेतकऱ्याने प्रसंगावधान साधत बछाड्याशी दोन हात करून हल्ला परतवून लावला.शेतकरी आपल्यावर भारी पडत असल्याचे लक्षात येताच वाघाच्या बछड्याने माघार घेत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.अशातच शेतकऱ्याने सदर घटनेबाबत आपल्या घरच्यांना फोनद्वारे माहिती दिली.माहिती मिळताच मुलगा व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता शेतकरी गोवर्धन डांगे हे जखमी अवस्थेत आढळून आले.त्यांच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमा होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊ लागल्याने गोवर्धन यांना ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.आज घडलेल्या चित्तथरारक घटनेने परिसरातील शेतकरी धास्तावले असून वन विभागाने हिंस्त्र प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
- Advertisement -