Tuesday, September 1, 2026
Homeकोंढाळावाघाने गोऱ्याला केले ठार; कोंढाळा जंगल परिसरातील आजची घटना...

वाघाने गोऱ्याला केले ठार; कोंढाळा जंगल परिसरातील आजची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(देसाईगंज):-कोंढाळा शेतशिवार नजीकच्या जंगल परिसरात गुरे चराईसाठी नेलेल्या कळपातील गोऱ्याला वन विभागाच्या कक्ष क्रमांक- ८०८ मध्ये वाघाने ठार केल्याची घटना आज,३१ ऑगस्टला सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
आज सकाळच्या सुमारास गावातील गुराख्याने कोंढाळा-रवी(रई)मार्गावरील शेतशिवार नजीकच्या जंगल परिसरात गुरे-ढोरे चराईसाठी नेली होती.गुरे- ढोरे चराई करीत असतांना दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक कळपावर हल्ला चढवला.हल्ला चढवताच ढोरे सैरावैरा पळू लागले.मात्र,गावातील शेतकरी यशवंत बिसन बुराडे यांच्या मालकीच्या असलेल्या गायीचे वासरू(गोरा)यांस वडसा वन विभागाअंतर्गत येणाऱ्या कोंढाळा जंगल परिसरातील कक्ष क्रमांक-८०८ मध्ये वाघाने हल्ला चढवून ठार केले.वाघाने गोऱ्याला ठार केल्याची माहिती गावातील वास्तव्यास असणाऱ्या महिला वनरक्षक निलिमा सेलोटे यांस देण्यात आली.लगेच सेलोटे यांनी वन क्षेत्रसहाय्यक के.वाय.कऱ्हाडे यांना सदर घटनेबाबत कळविले.वन क्षेत्रसहाय्यक व वनरक्षक यांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला.पंचनामा करतेवेळी गावातील अरुण दुपारे,गुरुदेव ठाकरे,जयानंद बुल्ले,राजेंद्र शेंडे व देवनाथ तुपट सह शेतकरी यशवंत बुराडे उपस्थित होते.वाघाने गोऱ्याला ठार केल्याप्रकरणी शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.करीता वन विभागाकडून लवकरात-लवकर नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी यशवंत बुराडे यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!