Monday, September 21, 2026
Homeगडचिरोलीवाघाच्या हल्ल्यात २५ वर्षीय गर्भवती महिला ठार.. - गडचिरोली जिल्ह्यातील आजची घटना...

वाघाच्या हल्ल्यात २५ वर्षीय गर्भवती महिला ठार.. – गडचिरोली जिल्ह्यातील आजची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शहरापासून १५ किलोमिटर अंतरावर असलेल्या कुरखेडा(चातगाव) येथील २५ वर्षीय गर्भवती महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज,शुक्रवार दिनांक-६ डिसेंबरला दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.शारदा महेश मानकर वय २५ वर्षे रा.कुरखेडा (चातगाव) ता.जि.गडचिरोली असे मृत गर्भवती महीलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,शारदा मानकर ही आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास गावालगत शेतबांधावर धानाचा खरा करण्यासाठी गेली होती.शेतालागतच जंगल परिसर लागून असल्याने दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक शारदा हिच्यावर हल्ला चढवला.वाघाने सरळ नरडीला पकडल्याने तिने आरडा-ओरड केली. आरडा-ओरड करताच आजूबाजूला शेतात काम करणाऱ्या महिलांनी घटनास्थळी धाव घेतली.महिलांनी धाव घेताच वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.मात्र,वाघाने शारदा मानकर हिच्या नरडीला पकडल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांनी मोठी गर्दी केली.घटनेची माहीती वनविभागाला कळताच वनकर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.शव उत्तरीय तपासणीसाठी गडचिरोली रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मृतक महिला ही आठ महिन्याची गर्भवती होती.तर महीलेस ३ वर्षाचा मुलगा आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

मोबाइलच्या आहारी गेलेल्या विद्यार्थिनीने संपवली जीवनयात्रा; घरातच घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईलची सवय अल्पवयीन मुलांसाठी जीवघेणी ठरू लागली आहे.पालक समजावण्याचा प्रयत्न करतात,पण काही जणांची स्थिती ऐकायला तयारच नसते आणि अनेकजण टोकाचे पाऊल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!