Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीवसतिगृह योजनेचा लाभ घ्यायचाय; तर १७ ऑगस्ट पर्यंत करा अर्ज..

वसतिगृह योजनेचा लाभ घ्यायचाय; तर १७ ऑगस्ट पर्यंत करा अर्ज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इतर मागासवर्ग(इमाव), विमुक्त जाती (विजाभज) आणि विशेष मागास प्रवर्गातील (विमाप्र)उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतीगृह योजनेचा लाभ घेण्यासाठी १७ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहे,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत वेळेत अर्ज सादर करून जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक डॉ.सचिन मडावी यांनी केले आहे.
  • वसतिगृह प्रवेश आणि विविध योजनांचा लाभ👇

इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत मुला-मुलींच्या वसतिगृहांमध्ये तसेच आधार व स्वयंम योजनेअंतर्गत १२ वी नंतरच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ घेता येणार आहे.विशेषतः, बी.ए.,बी.कॉम,बी.एस.सी.अशा १२ वी नंतरच्या पदवी अभ्यासक्रमांमध्ये आणि एम.ए., एम.एस.सी.अशा पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा.

  • अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा👇

शासकीय पोर्टल https://hmas.mahait.org वर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांनी १ ऑगस्ट २०२५ ते १७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आपले अर्ज ऑनलाइन भरून,त्याची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित वसतिगृहांमध्ये विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे.

  • अधिक माहितीसाठी संपर्क👇
अधिक माहितीसाठी विद्यार्थी ओबीसी मुला-मुलींचे वसतिगृह,गडचिरोली येथील गृहपाल किंवा सहाय्यक संचालक कार्यालय,सामाजिक न्याय भवन, आयटीआय चौक येथे संपर्क साधावा असे डॉ.सचिन मडावी यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!