Friday, September 4, 2026
Homeनागपूरवर्ल्ड चॅम्पियन बुद्धिबळ पटू दिव्या देशमुख आज नागपुरात..

वर्ल्ड चॅम्पियन बुद्धिबळ पटू दिव्या देशमुख आज नागपुरात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूरची १९ वर्षीय वर्ल्ड चॅम्पियन बुद्धिबळ पटू दिव्या देशमुख हिचे फिडे महिला विश्व चॅम्पियन बनल्यानंतर आज,बुधवार ३० जुलै रोजी  नागपूरमध्ये रात्री ९ वाजताच्या सुमारास आगमन होणार आहे.महाराष्ट्र आणि देशाचा सन्मान उंचाविणारी विलक्षण प्रतिभेची धनी दिव्याचे नागपूर विमानतळावर भव्य स्वागत करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत.दिव्याने सोमवारी बाटुमी (जॉर्जिया) येथे संपलेल्या महिलांच्या फिडे विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील अंतिम सामन्यात सहकारी ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिच्यावर शानदार विजय मिळवून प्रथमच जगज्जेतेपद पटकावले.त्यानंतर ती पहिल्यांदा नागपुरात परतणार आहे.दिव्याचे नागपुरात आगमन होताच मान्यवरांच्या हस्ते तिचे स्वागत करण्यात येईल,असे चेस असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष गिरीश व्यास आणि सचिव भूषण श्रीवास यांनी म्हटले आहे.
यावेळी एआयसीएफचे महासचिव देव पटेल, द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त ग्रँडमास्टर अभिजित कुंटे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आमदार परिणय फुके,आमदार कृष्णा खोपडे,आमदार प्रवीण दटके,आमदार विकास ठाकरे,आमदार डॉ.नितीन राऊत,आमदार संदीप जोशी,आमदार ॲड.अभिजित वंजारी,आमदार समीर मेघे यांच्यासह शहर भाजप अध्यक्ष आणि माजी महापौर दयाशंकर तिवारी उपस्थित राहणार आहेत.नागपुरातील सर्व बुद्धिबळ खेळाडू,पालक,अधिकारी,प्रशिक्षक,चाहते आणि बुद्धिबळप्रेमींनी दिव्याच्या स्वागताला विमानतळावर उपस्थित राहावे,असे आवाहन श्रीवास यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!