उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्यातील महिलांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे.येत्या रक्षाबंधनाला राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून एक खास गिफ्ट मिळणार आहे.लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात जमा होणार आहे; अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. या योजनेसाठी महिलांची खाती उघडण्यासाठी ‘युआरएल’ तयार केला जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार आहे.या योजनेच्या पहिल्या हप्त्यामध्ये महिलांना तीन हजार रूपये रक्कम मिळणार आहे.ही योजना नागरिकांपर्यंत पोहोचावी म्हणून राजकीय नेत्यांनी विशेष शिबिरे आयोजित केली होती.ठिकठिकाणी या योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.आतापर्यंत योजनेसाठी ४४ लाख महिलांची नोंद करण्यात आली आहे.तर १० लाख अर्ज संबंधित खात्यापर्यंत पोहोचले आहेत.महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेसाठी अंगणवाडी सेविकांना एका अर्जामागे ५० रूपये देण्याची घोषणा केली आहे.