- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काल,रविवार २१ डिसेंबरला निकाल समोर आले.राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या यशानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. ‘लाडक्या बहिणींना दिलेला शब्द आम्ही पाळणार असून सन्मान निधी २,१०० रुपये करणारच,’ असे ठाम आश्वासन शिंदे यांनी विजयाचा जल्लोष साजरा करतांना केले.विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने लाडकी बहीण योजनेचा निधी दीड हजर रुपयांवरून २,१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते.यावर बोलतांना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘अनेकांनी ही योजना बंद पाडण्याचे प्रयत्न केले,मात्र आम्ही सर्व अडथळे दूर करून ती यशस्वी केली.आता कोणताही ‘माईचा लाल’ ही योजना बंद करू शकणार नाही.आम्ही बहिणींना दिलेला शब्द विसरलेलो नाही.योग्य वेळी लाडक्या
बहिणींचा सन्मान निधी २,१०० रुपये केला जाईल.’ राज्यातील २८८ नगराध्यक्षपदांपैकी तब्बल २१४ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.या यशाचे विश्लेषण करतांना एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहीण योजने’चा प्रभाव अधोरेखित केला. शिवसेनेच्या(शिंदे गट) आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच ५७ नगराध्यक्ष निवडून आले असून पक्ष राज्यात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.या यशाचे
श्रेय त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि राज्यातील
महिला शक्तीला दिले आहे.
- Advertisement -

