- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-
तेंदूपानांची वाहतूक करण्याकरिता नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एका तेंदू कंत्राटदाराकडून १ लाख ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अहेरी येथील प्रभारी गटविकास अधिकाऱ्यासह तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. प्रतीक दिवाकर चन्नावार,संजीव येल्ला कोठारी व अनिल बुधाजी गोवर्धन अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.यातील प्रतीक चन्नावार हे प्रभारी गटविकास अधिकारी असून,संजीव कोठारी हा कंत्राटी पेसा समन्वयक तर अनिल गोवर्धन हा खासगी व्यक्ती आहे.एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारकर्त्या कंत्राटदाराने गोविंदगाव येथील तेंदूपानांचे युनिट लिलावाद्वारे खरेदी केले होते.या तेंदूपानांची वाहतूक करण्याकरिता पंचायत समितीकडून नाहरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती.हे प्रमाणपत्र देण्यासाठी गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार व तालुका पेसा समन्वयक संजीव कोठारी यांनी कंत्राटदारास १ लाख ३० हजार रुपयांची लाच मागितली.परंतु लाच देण्याची मूळीच इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल २५ ऑगस्ट २०२३ रोजी सापळा रचला असता अनिल गोवर्धन याच्या माध्यमातून तक्रारकर्त्याकडून १ लाख ३० हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताना रंगेहाथ पकडले.याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रभारी गटविकास अधिकारी प्रतीक चन्नावार फरार आहेत.
- Advertisement -