Tuesday, September 8, 2026
Homeनागपूरलाईनमनला 'एसीबी'चा जोरदार झटका..!

लाईनमनला ‘एसीबी’चा जोरदार झटका..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका ३६ वर्षीय कंत्राटी लाईनमनला नागपूरच्या एसीबी पथकाने तब्बल ८ हजार ५०० रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडुन जोरदार झटका दिला आहे.मुकेश चिंतामण मस्के वय ३६ वर्षे, रा.सावनेर शहर,वॉर्ड क्रमांक-४,वेकोलि रोड,नागमंदिराजवळ, जि.नागपूर असे अटक केलेल्या लाचखोर लाईनमनचे नाव आहे.
तक्रारदाराची सावनेर शहरात एका भाड्याच्या खोलीमध्ये फोटो स्टुडिओची दुकान आहे.दुकानातील विद्युत मीटरचे ५ हजार १७० रुपयांचे वीज बिल थकीत होते.त्यामुळे, लाईनमन मस्के यांनी फोटो स्टुडिओचा वीजपुरवठा खंडित केला व विजेचे मीटर काढून नेले होते.दरम्यान, तक्रारदाराने लाईनमनला वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली असता वीजबिलापेक्षा अतिरिक्त रकमेची मागणी केली.जास्तीच्या रकमेची मागणी केल्याने तक्रारदाराने २ सप्टेंबर २०२६ रोजी नागपूरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे(एसीबी)तक्रार नोंदविली. एसीबीच्या पथकाने दुसऱ्याच दिवशी तक्रारीची पंचासह पडताळणी केली.पडताळणीत मुकेश मस्के यांनी ८ हजार ५०० रुपये घेण्यास सहमती दर्शविली.त्यानुसार, काल सोमवार ७ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास एसीबीच्या पथकाने सावनेर शहरात सापळा रचला व लाईनमनला ८ हजार ५०० रुपये स्वीकारतांना रंगेहाथ अटक केली.प्रकरणी आरोपीविरोधात सावनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई नागपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक डॉ.दिगंबर प्रधान,अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी बाविस्कर व विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव,सुषमा बिसंदरे,हेडकॉन्स्टेबल अनिल बहिरे, अस्मिता,विकेश राऊत आदींनी कारवाई केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!