Monday, December 8, 2025
Homeगडचिरोलीरोजगार हमी योजनेची सहा महिन्यांपासून मजुरांची मजुरी थकीत; मजुरांनी पोट कशाने भरावे?...

रोजगार हमी योजनेची सहा महिन्यांपासून मजुरांची मजुरी थकीत; मजुरांनी पोट कशाने भरावे? -काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील बाराही तालुक्यात  शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांच्या हाताला काम देऊन मोठ्या प्रमाणावर अकुशल कामे करण्यात आली.कामे करून जवळपास सहा महिने लोटूनही जिल्ह्यातील मजुरांची कोट्यवधी रुपयांची मजुरी थकीत असल्याने मजुरांनी पोट कशाने भरावे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे निर्दयी सरकारने मजुरांची मजुरी तात्काळ अदा करावी, अन्यथा जिल्हाभरात आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा ओबीसी काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी दिला आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांनी रोजगार हमी योजनेंतर्गत कामे केली असून,६ महिने झाले तरीही अजूनपर्यंत मजुरी मिळालेली नाही.शासनाकडून प्रत्येक मजुराला काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेंतर्गत काम दिले जात आहे.परंतु,मजुरांनी काम केले असतांना मजुरी दिली जात नसेल तर काम करण्याचा उपयोग काय?रोजगार हमी योजनेंतर्गत मातीकाम,तलाव खोलीकरण, मजगी,एकेरिकरण,वृक्ष लागवड,घरकुल बांधकाम, जनावरांच्या गोठ्याचे बांधकाम व इतर सार्वजनिक कामे मजुरांच्या वतीने करण्यात येतात. परंतु,सहा महिने लोटले असतांनाही आजपर्यंत रोजगार हमी योजनेची मजुरी मिळाली नसल्यामुळे मजूर चिंतेत पडले आहेत. मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.पंचायत समिती व तहसील स्तरावरून शासनाकडे मस्टर(हजेरीपत्रक) पाठवले जात असल्याचे सांगितले जात आहे.परंतु,६ महिन्यांपासून मजुरीचे पैसे कुठे अडकलेत? याचा काही थांगपत्ताच लागेनासा झाला आहे.यासाठी प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांची रखडलेली मजुरी द्यावी,अशी मागणी ओबीसी काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोलीत साहित्यिकांची मांदियाळी..! नाट्यश्रीचा वाङ्ममय पुरस्कार सोहळा व काव्य संमेलन संपन्न.. – इंग्लंड,गोवा,बुऱ्हाणपूर,बंगलोर येथील साहित्यिकांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नाट्यश्री साहित्य कला मंचच्या वतीने आयोजित महामृत्युंजय वाङ्ममय पुरस्कार सोहळा तसेच कवी संमेलनासाठी राज्यभरातून तसेच देश विदेशातून साहित्यिकांची मांदीयाळी काल,रविवार ७...

एका ठिकाणी पती-पत्नीने; तर दुसऱ्या ठिकाणी टॉप टेन नक्षलवाद्यांनी सोडली लाल दहशत..

उद्रेक न्युज वृत्त :-दुर्गम भागात बऱ्याच कालावधीपासून लाल दहशतीचे सावट पसरले होते.यामुळे तेथील विकास कोसोदुर राहिला आणि अजूनही काही ठिकाणी जैसे-थे अवस्था पहावयास मिळत...

अजब रोमियोचा गजब कारनामा..! नर्सिंग कॉलेजात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला रस्त्यात गाठले अन् गालाचा घेतला मुका.. – आरोपीची तुरुंगात रवानगी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपुर :-जिल्ह्याच्या भिवापूर शहरात अजब रोड रोमियोचा गजब कारनामा उघडकीस येताच पोलिसांनी अटक केल्यानंतर लागलीच त्याला भिवापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयापुढे...

दौलत कुथे ‘नाट्यश्री २०२५’ पुरस्काराने सन्मानित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली यांच्या वतीने आयोजित ‘महामृत्युंजय वाड्:मय स्पर्धा २०२५’ पुरस्कार वितरण सोहळा काल,रविवार ७ डिसेंबर रोजी जिल्हा मध्यवर्ती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!