Saturday, August 8, 2026
Homeसिंदेवाहीरेशन दुकानातील मक्याचे करायचे काय? मका दळून मिळत नसल्याने लाभार्थी अडचणीत..

रेशन दुकानातील मक्याचे करायचे काय? मका दळून मिळत नसल्याने लाभार्थी अडचणीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
प्रशांत गेडाम
सिंदेवाही(चंद्रपूर):-महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली(रेशन)अंतर्गत गव्हासोबत किंवा काही प्रमाणात गव्हाऐवजी मक्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र,या निर्णयामुळे ग्रामीण भागातील अनेक रेशनधारकांसमोर नवीन अडचणी निर्माण झाल्या आहेत. रेशन दुकानातून मिळणारा मका दळण्यासाठी लाभार्थी स्थानिक आटा चक्क्यांवर जात असतांना अनेक चक्कीचालकांकडून मका दळण्यास नकार दिला जात असल्याची तक्रार समोर आली आहे.चक्कीचालकांचे म्हणणे आहे की,मक्याचे दाणे अधिक कठीण असल्यामुळे दगडी चक्की किंवा सर्वसाधारण गिरणीचे दगड व पाते खराब होण्याची शक्यता असते.तसेच चक्की जाम होणे,पीठ व्यवस्थित न होणे आणि यंत्राचे नुकसान होण्याचा धोका असल्याने मका दळणे शक्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.यामुळे रेशनधारकांची मोठी गैरसोय होत असून शासनाने वाटप केलेला मका वापरायचा कसा? असा प्रश्न लाभार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे,मका दळण्यासाठी पर्यायी व्यवस्था किंवा विशेष चक्क्यांची माहितीही अनेक ठिकाणी उपलब्ध करून दिली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.त्यामुळे,रेशन दुकानातील मक्याचे करायचे काय? हे शासनानेच ठरवावे असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.काही ठिकाणी मक्याची विक्री केल्या जात असल्याच्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत.हे खरे असले तरी प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या समस्यांचे काय?काही जणांच्या जेवणातील पोळी गायब झाल्याने मक्याचा ढासला खायचा काय?असा विचार अनेकांच्या मनात घर करून राहिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची...

गडचिरोलीची बदनामी करण्याचा डाव; नागरिकांनी तथ्य पडताळूनच माहिती शेअर करावी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली...

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!