Thursday, July 30, 2026
Homeनागपूररेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.निरंजन लक्ष्मण फिरके वय ४० वर्षे व योगेश लक्ष्मण फिरके वय ३७ वर्षे,रा.सावनेर,ता.सावनेर,जि.नागपूर अशी मृतक भावांची नावे  आहेत.धडक इतकी भीषण होती की दोन्ही भावांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले.सदरची दुर्घटना नेमकी कशामुळे घडली,अद्याप स्पष्ट झाले नसून सावनेर पोलीस प्रशासनाकडून प्रत्यक्षदर्शी तसेच इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.घटना उघडकीस येताच याबाबतची माहिती अंकित हांडे यांनी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांना दिली.त्यानंतर,तात्काळ सावनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना याची माहिती देण्यात आली.माहिती मिळताच सावनेर पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान,स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.तेथे डॉक्टरांनी तपासणी अंती दोघांनाही मृत घोषित केले.दोन सख्ख्या भावांचा एकाच दुर्घटनेत मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

लाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला.दरम्यान,चालकाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला खरी,पण त्याचा प्रयत्न...

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!