उद्रेक न्युज वृत्त
ब्रह्मपुरी :- तालुक्यातील तपाळ रेती घाटावरून अवैध रेतीतस्करी होत असल्याचे तहसीलदार उषा चौधरी यांना माहिती पडताच त्यांनी लेखी आदेश काढून सदर होत असलेल्या अवैध रेतीतस्करी करणाऱ्यांवर कावाईचे आदेश तलाठ्यांना दिले.तलाठी राजेश आकोजवार व हिमांशू पाजनकर हे दोन्ही तलाठी कहाली गावा जवळील सकाळच्या सुमारास एका ट्रॅक्टरला थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने ट्रॅक्टर न थांबवता,शेतात नेऊन उभा केला.दोन्ही तलाठी वाहनाजवळ गेले असता ट्रॅक्टरचे नंबर प्लेट नव्हते.त्यामधे अंदाजे जवळपास एक ब्रास रेती भरलेली असल्याचे तलाठ्यांना आढळून आले.
ट्रॅक्टर मध्ये असलेल्या रेती बाबत ट्रॅक्टर चालकाला विचारले असता त्याने माहिती देण्यास टाळटाळ केली.तसेच त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावण्यासाठी तलाठ्यांनी सांगितले असता चालकाने सदर ट्रॅक्टर प्रिन्स श्रीनाथ सिंग याचा असल्याचे सांगितले.दरम्यान प्रिंन्स श्रीनाथ सिंग दोन इसमासह घटनास्थळी येऊन दोघांवर हल्ला चढवून मारहाण केली असल्याचे तलाठ्यांनी कथन केले.कॉलर पकडून जिवे मारण्याची धमकी व ट्रॅक्टर अडविण्यासाठी प्रयत्न केला तर प्रिंन्स श्रीनाथ सिंग व त्याचे सहकारी आम्हाला मारण्यासाठी धावले असल्याचे तलाठ्यांनी म्हटले आहे.प्रसंगावधान बघून तलाठ्यांनी स्वः रक्षणासाठी घटनास्थळावरू पलायन केले.
सदर घटनेची माहिती मंडळ अधिकारी अ-हेरनवरगाव व तहसीलदार यांना देऊन पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली.सदर तक्रारीवरून रेती तस्कर प्रिंन्स श्रीनाथ सिंग व इत सहकारी यांच्या विरोधात भादंवि १८६० अधिनियचे कलम ३५३,३७९,३२३,५०४, ५०६ व कलम३४ अन्वये गुन्ह दाखल करण्यात आला आहे. आरोपींन अटक करण्यात आली असून सदर घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस प्रशासन करीत आहे.