Monday, June 29, 2026
Homeदेसाईगंजरेती घाटावरील सिमांकन पोल बाबत मंडळ अधिकाऱ्यांना पडला विसर?.. - झेंड्या मच्छीमारांनी...

रेती घाटावरील सिमांकन पोल बाबत मंडळ अधिकाऱ्यांना पडला विसर?.. – झेंड्या मच्छीमारांनी उपटून नेल्याचे दोघांचेही एक्झॅक्ट उत्तर… – कोंढाळा-सिंद्राई घाटात अजब-गजब प्रकार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  कोंढाळा येथील मेंढा वैनगंगा नदी रेती घाटातील कोट्यवधी रुपयांचे अवैध वाळू उपसा प्रकरण ताजे असतांनाच आता कोंढाळाच्या सिंद्राई रेती घाटावर डल्ला मारण्याचा प्रकार सुरू झाल्याचे काल,बुधवारी २३ एप्रिल रोजी प्रत्यक्ष रेती घाटातील पाहणीवरून दिसून आले.वाळू उपसा होत असतांना कुठून कुठपर्यंत वाळूचे उत्खनन होणार आहे; याबाबत सिमांकन झेंड्या नसल्याने कंत्राटदाराच्या दिवाणजीने तसेच गावातील तलाठीने एकच एक्झॅक्ट उत्तर दिल्याने उंचावणाऱ्या भुवया एकदम खाली गेल्या. दोघांनीही सिमांकन करण्यात आलेल्या झेंड्या मच्छीमारांनी उपटून नेल्या असल्याचे सांगितले. मात्र,रेती घाटाचा ताबा देत असतांनाच सर्वप्रथम कुठून-कुठपर्यंत रेतीचा उपसा करण्यात यावा,यासाठी रेती घाटावर झेंड्या नाही तर पोल गाळाने आवश्यक आहे व सदर रेती घाटाचा ताबा हा त्या महसूल विभागाच्या सर्कल मधील मंडळ अधिकारी देत असतो.मात्र,कोंढाळा येथील सिंद्राई रेती घाटात ना झेंड्या दिसतात,ना पोल दिसून येतात.अशातच देसाईगंज महसूल विभागाच्या कोंढाळा सर्कलमध्ये किशोर पी.ठाकरे हे मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.त्यातच ‘दिवालीला म्हणजेच भिंतीलाही कान असतातच’ या म्हणीप्रमाणे गल्लीबोळात सुरू असणाऱ्या चर्चेनुसार कंत्राटदार व मंडळ अधिकारीही आरमोरी सर्कलचेच असल्याने मंडळ अधिकाऱ्यांना रेती घाटावरील पोल बाबत विसर पडला की काय? नाहीतर कुणी तरी गाळलेले पोलही उपटून नेलेत,अशी म्हणण्याची वेळ येऊ नये.रेती उपसा करण्याची खोली १ मीटर असतांना वाळूचा उपसा भुईसपाट होऊनही मंडळ अधिकारी एवढे निद्रावस्थेत कां? असा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे पाणी कुठेतरी मुरले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही व एक दिवस कोंढाळा गावातील वाळू घाटांचे ‘जय हिंद जय भारत’ झाल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे याबाबत गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दाखल येणार आहे.हे विशेष.
(पुढील वृत्त -पर्यावरणाची परवानगी असूनही पर्यावरणाचा ऱ्हास)
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये जल्लोषात शाळा प्रवेशोत्सव.. – पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके,गणवेश व शालेय साहित्यांच्या वितरणाचे नियोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड अंतर्गत कार्यरत ८ शासकीय व १६ अनुदानित आश्रमशाळांमध्ये उद्या,मंगळवार ३० जून २०२६ रोजी शाळा प्रवेशोत्सव उत्साहात...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात आज,सोमवार २९ जून ते १३ जुलै २०२६ या...

देसाईगंज रेल्वे बोगदा मार्गावरील वाहतूक आणखी ११ दिवस राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-देसाईगंज(वडसा)रेल्वे स्थानकाजवळील एलएचएस-५९(रेल्वे बोगदा अंडरपास)येथील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतुकीवरील निर्बंधांची मुदत १० जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली...

३१ वर्षीय तरुण वाघाच्या हल्ल्यात ठार..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-३१ वर्षीय तरुण वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पा लगतच्या चोरगाव परिसरात उघडकीस आली.कुंपणासाठी शेताच्या बाजूच्या झाडांच्या फांद्या तोडत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!