- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात असून फाईलींचा गट्टा तयार झालेला आहे.विविध ठिकाणी कोट्यवधी रुपयांच्या अवैध रेतीचे प्रकरण दाबल्या गेलेत अन् एका रेतीच्या ट्रकमुळे ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची आता विभागीय चौकशी करण्यात येणार आहे. याविषयावर न बोललेले बरे.कारण की ते तुम्हालाही कळतेच,हे सांगण्याची गरज नाही.२८ ऑक्टोंबर २०२५ च्या रात्री ब्रम्हपुरीचे एसडीपीओ म्हणजेच उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांनी चिमूर येथील एमएच ३६ एए ९८३३ या क्रमाकांचा रेतीने भरलेला हायवा ट्रक पकडला होता.मात्र,त्यावर कोणतीही कारवाई न करता तो हायवा ट्रक चिमूर ठाण्यातच तब्बल दहा दिवस उभा केला होता. याबाबत तक्रारी झाल्या आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अप्पर अधीक्षकांची समिती नेमून चौकशी केली असता,हायवामालकाने ५० हजार रुपये दिल्याचे समोर आले.तसा चौकशी अहवाल पोलिस अधीक्षकांनी पोलिस महानिरीक्षकांच्या माध्यमातून पोलिस महासंचालकांकडे पाठवला होता. मात्र,अद्यापही त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नव्हती.अश्यातच यासंदर्भात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती.त्यांनी सांगितले की,ब्रम्हपुरीचे एसडीपीओ वाळू माफियांना संरक्षण देत आहेत,तसेच आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन कारवाई करत आहेत.त्यासोबतच,भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी एसडीपीओची हिंमत इतकी वाढली आहे की,आपले कोणीही काही बिघडवू शकत नाही,असा दावा तो करत आहे.त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित केले पाहिजे,अशी मागणी केली.प्रकरणी राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या प्रकरणाची विभागीय चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असल्याचे सांगितले.चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.तत्पूर्वी विभागीय चौकशीदरम्यान जाधव यांची बदली करण्यात येईल,असे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केले.
- Advertisement -

