Wednesday, June 10, 2026
Homeगडचिरोलीराष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून ६९ प्रलंबित आणि १८७७ दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली -...

राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून ६९ प्रलंबित आणि १८७७ दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली – २.१० कोटी रुपयांची वसुली

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 गडचिरोली : – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,दिल्ली यांचे आदेशान्वये व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यातील न्यायालयात ११ फेब्रुवारी २०२३ रोजी तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे,१३८ एन.आय.ॲक्ट प्रकरणे, भुसंपादन प्रकरणे,कौटुंबिक प्रकरणे,मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे,दरखास्त प्रकरणे,बॅकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन,मोबाईल कंपनी संबंधीत वाद,महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे,पतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे, नगर परिषद अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे इत्यादी मामल्याकरीता राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून ६९ प्रलंबित आणि १८७७ दाखलपुर्व खटले आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले आणि रुपये २,१०,८४,०९६/-वसुली करण्यात आली आहे.किरकोळ स्वरुपाच्या वादांकरीता सस्पशेल ड्रायव्हरद्वारे एकूण ३१ प्रकरणे निकाली काढण्यात आली.वैवाहिक वादाच्या एका प्रकरणात पती पत्नी यांचा समझोता होवून पत्नी नांदायला गेल्याने जिल्हा न्यायाधिश-१ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश, गडचिरोली यु.एम. मुधोळकर यांनी उभयतांचा साडी-चोळी व शेला देवून सत्कार केला.

प्र.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश  तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यु.एम. मुधोळकर व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली आर.आर.पाटील यांचे देखरेखीखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा न्यायाधिश-१ तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश, गडचिरोली यु.एम. मुधोळकर यांनी पॅनल क्र.०१ वर काम पाहिले.पॅनल क्र.०२ वर दिवाणी न्यायाधिश (व.स्तर) तथा मुख्यन्यायदंडाधिकारी,गडचिरोली एम. आर.वाशिमकर,पॅनल क्रं.०३ वर सह दिवाणी न्यायाधिश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.), गडचिरोली, सी.पी.रघुवंशी यांनी काम पाहिले.११ फेब्रुवारी २०२३ रोजी कार्यालयीन कामकाज दिवस घोषित करुन किरकोळ गुन्ह्याचे खटले फौ.प्र.सं. कलम २५६,२५८ अन्वये तसेच गुन्हा कबुलीद्वारे निकाली काढण्याकरीता एन.सी.सोरते,तृतीय सहदिवाणी न्यायाधिश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्र.श्रे.) गडचिरोली यांचे न्यायालय कार्यरत होते.तसेच वाहतुकीचे नियम भंग केल्याप्रकरणी ऑनलाईन चालान रक्कम स्विकारण्याकरीता पोलीस विभागातर्फे व्यवस्था करण्यात आलेली होती.तसेच पॅनल क्रमांक ०१ मध्ये पॅनल सदस्य म्हणून कु.अर्चना चुधरी,विधी स्वयंसेविका,पॅनल क्रमांक ०२ मध्ये पॅनल सदस्य म्हणून बी.एन.बावणे,विधी स्वयंसेवक,पॅनल क्रमांक ०३ मध्ये पॅनल सदस्य म्हणून कु.तृप्ती रविंद्र पाल, विधी स्वयंसेविका यांनी काम केले.

सदर लोकन्यायालय यशस्वी करण्याकरीता गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष रविंद्र दोनाडकर तसेच जिल्हा वकील संघाचे जेष्ठ अधिवक्ता आणि इतर वकील वृंद व न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.असे अधिक्षक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!